scorecardresearch

“आता दोन-दोन पोरी भेटल्यात तरी…” प्रदीपच्या रडण्याच्या व्हिडीओवर मानसी नाईक स्पष्टच बोलली

“जिच्या जीवावर खाल्लं, जिचा फुकट वापर केला त्याला.. ” असेही मानसीने यात म्हटले आहे.

“आता दोन-दोन पोरी भेटल्यात तरी…” प्रदीपच्या रडण्याच्या व्हिडीओवर मानसी नाईक स्पष्टच बोलली
मानसी नाईकची ती पोस्ट चर्चेत आहे.

‘बाई वाड्यावर या’, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ यांसारख्या गाण्यांमधून चाहत्यांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते. मानसी नाईक ही सातत्याने चर्चेत आहे. ती लवकरच घटस्फोट घेणार आहे. मानसी नाईक आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्या वैवाहिक जीवनात वादळ आलं आहे. त्यातच तिच्या पतीने रडतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यावर आता मानसी नाईकने टीका केली आहे.

प्रदीप खरेराने काही दिवसांपूर्वी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक रील व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये प्रदीप मोबाईलवर हेडफोन्स लावून गाणी ऐकताना दिसत आहे. ही गाणी ऐकताना त्याचे डोळे पाणावलेलेही दिसत आहे. या व्हिडीओला त्याने “जुदा हो के भी तू मुझमे कही बाकी है” हे इमरान हाशमीच्या चित्रपटातील गाणं दिलं आहे. “तुम्हालाही कोणतं गाणं ऐकताच रडू कोसळतं का?” असं कॅप्शन प्रदीपने या पोस्टला दिलं आहे. प्रदीपची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली होती. अनेकांनी त्याच्या या व्हिडीओचा संदर्भ मानसी नाईकशी जोडला होता. त्यावर आता मानसीने सडेतोड उत्तर दिले आहे.
आणखी वाचा : “एवढ्या खालच्या थराला…” मानसी नाईकने सांगितले घटस्फोट घेण्यामागचे कारण

मानसी नाईक ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. नुकतंच तिने प्रदीप खरेराच्या रडणाऱ्या व्हिडीओबद्दल भाष्य केले आहे. मानसीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात तिने त्याच्यावर टीका केली आहे.

“आता एक नाही तर दोन-दोन पोरी भेटल्यात आणि खरं तर रडण्याच्या ओव्हर अॅक्टिंचे ५० रुपये कापायला पाहिजेत. हा एकीकडे पार्ट्या करतोय आणि रीलमध्ये रडून दाखवतोय. खोटं प्रेम… मीच फुकटची सहानुभूती देऊन  टाकते. जिच्या जीवावर खाल्लं, जिचा फुकट वापर केला. कर्माची फळ मिळतातच”,  असे मानसीने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

manasi naik
मानसी नाईक

आणखी वाचा- “त्यांनी मित्राचा बुरखा पांघरला आणि…” घटस्फोटाच्या चर्चांवर मानसी नाईकने पहिल्यांदाच सोडलं मौन

दरम्यान मानसी नाईकची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिने तिच्या या पोस्टमध्ये प्रदीपचा उल्लेख केला नसला तरी तिने अप्रत्यक्षरित्या त्याला टोला लगावला आहे. तिची ही स्टोरी सध्या चांगलीच चर्चेत आहे.  

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-12-2022 at 13:13 IST

संबंधित बातम्या