अभिनेत्री मिथिला पालकर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा हसरा चेहरा हा प्रेक्षकांच्या जसा नेहमी डोळ्यासमोर असतो. पण सध्या मिथिला तिच्या आयुष्यातील अत्यंत आव्हानात्मक दिवसातून जात आहे. मिथिलाच्या आयुष्यात तिचे आजोबा सगळ्यात महत्त्वाचे होते.
मिथिला तिच्या आजोबांना प्रेमानं भाऊ म्हणून हाक मारायची. तर मिथिलाच्या आजोबांचे वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास केला आहे. २६ मार्च रोजी तिच्या आजोबांनी जगाचा निरोप घेतला. त्यानंतर आता काही दिवसांनीच मिथिलानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
आजोबांचे काही फोटो शेअर करत मिथिला म्हणाली, “माझ्या विश्वाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या आणि मला प्रोत्साहन देणाऱ्यांमध्ये सगळ्यात पुढे असणारे माझे भाऊ काही दिवसांपूर्वीच आम्हाला सोडून गेले. त्यांच्याशिवाय असणारं आयुष्य मला ठाऊक नाही, कळणारही नाही. मला इतकंच ठाऊक आहे, की ते एक लढवय्ये होते. ते माझ्यासाठी खास होते आणि कायम सगळ्यात पुढे राहतील. तुमच्या त्या हसण्यामुळं…आता स्वर्गातही आनंदी वातावरण असेल,” अशा आशयाचे कॅप्शन मिथिलाने दिले आहे.