scorecardresearch

लग्नापूर्वीच आई होण्याचं स्वप्न पाहतेय मृणाल ठाकूर, अभिनेत्रीच्या ‘त्या’ वक्तव्याची सर्वत्र चर्चा

अभिनेत्री मृणाल ठाकूरने तिच्या खासगी आयुष्याबाबत खुलासे केले आहेत.

लग्नापूर्वीच आई होण्याचं स्वप्न पाहतेय मृणाल ठाकूर, अभिनेत्रीच्या ‘त्या’ वक्तव्याची सर्वत्र चर्चा
अभिनेत्री मृणाल ठाकूरने तिच्या खासगी आयुष्याबाबत खुलासे केले आहेत.

हिंदी मालिका ते बॉलिवूड असा अभिनेत्री मृणाल ठाकूरचा प्रवास फारच कौतुकास्पद आहे. हिंदी चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका साकारत तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. बॉलिवूडमध्ये मृणालने स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. इतकंच नव्हे तर तिचा ‘सीता रमण’ हा तेलुगू चित्रपटही अलिकडेच प्रदर्शित झाला. आपल्या कामामुळे प्रकाशझोतात आलेली मृणाल आता तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

आणखी वाचा – “उर्वशी रौतेला कोण?” रिलेशनशिपच्या चर्चा अन् पाकिस्तानी क्रिकेटपटूचं सडेतोड उत्तर, अभिनेत्रीने घेतला ‘हा’ निर्णय

मृणाल ‘डेटिंग दिस नाइट्स’ या शोमध्ये हजेरी लावणार आहे. हा भाग १५ स्पटेंबरला प्रसारित होईल. तसेच यामध्ये मृणाल आपल्या खासगी आयुष्याबाबत बोलताना दिसणार आहे. या शोमध्येच तिने आपल्या खासगी आयुष्याबाबत काही खुलासे केले आहेत. इतकंच नव्हे तर आई बनण्याची इच्छा देखील तिने यावेळी बोलून दाखवली.

मृणाल म्हणाली, “माझ्या मनात काय सुरु आहे, मी कोणत्या क्षेत्रात काम करते हे समजून घेणारा जोडीदार मला हवा आहे. आपण आजही असुरक्षित आहोत. अशा वातावरणामध्ये मला सुरक्षित ठेवेल अशा व्यक्तीच्या मी शोधात आहे. पण अशाप्रकारचा जोडीदार मिळणं फार कमी लोकांच्या नशीबामध्ये असतं.”

आणखी वाचा – लग्न, घटस्फोट, दोनवेळा गर्भपात, कर्करोग अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरीचा खासगी आयुष्याबाबत खुलासा

ती पुढे म्हणाली, “बऱ्याचदा मला असं वाटतं की मी मुलाला जन्म दिला पाहिजे.” सिंगल मदर म्हणून जगण्याच्या निर्णयाला मृणालची आई तिला पाठिंबा देते. प्रेमामध्ये खचून न जाता मला प्रेमामध्ये जगायचं आहे असं देखील मृणाल सांगते. पण लग्नापूर्वीच तिची आई होण्याची इच्छा ऐकून सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress mrunal thakur talk about her personal life says i want a baby before marriage see details kmd

ताज्या बातम्या