‘गोरे रंग पे न इतना गुमान कर’ हे गाणं म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर एकच चेहरा येतो तो म्हणजे अभिनेत्री मुमताज यांचा. ६०- ७० च्या दशकात मुमताज यांनी अभिनय कौशल्य आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यानंतर मुमताज या चित्रपटसृष्टीपासून अनेक वर्ष लांब असल्याचे पाहायला मिळत होते. बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांना नुकतंच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डायरियाचा (जुलाब) त्रास सुरू झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या सात दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. नुकतंच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी त्यांच्या तब्येतीबाबत अपडेट दिली आही. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान मुमताज यांनी रुग्णालयात मला माझ्या त्वचेमुळे खूप त्रास सहन करावा लागला, असा खुलासा केला आहे. तसेच त्यावेळी माझ्या एका हातावर प्रचंड ताण आला होता. कारण काही वर्षांपूर्वी स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारादरम्यान माझ्या डाव्या हातातील लिम्फ नोड्स काढण्यात आल्या होत्या. त्यामुळे इंजेक्शन देण्यासाठी मला तो हात वापरणे शक्य नव्हते, असेही त्या म्हणाल्या.

Sexual abuse of young woman by pretending treatment case filed against self-proclaimed doctor in Nalasopara
उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार, नालासोपार्‍यात स्वयंघोषित वैद्याविरोधात गुन्हा दाखल
is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
chandigarh doctor grandfather sbi share 500 rupees in 1994 know profit
याला म्हणतात खरी गुंतवणूक! आजोबांनी ३० वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या ५०० रुपयांच्या शेअरवर नातू झाला लखपती
Afgan Women
‘व्याभिचार केल्यास महिलांना खुलेआम दगडाने ठेचून मारले जाणार’ तालिबानची घोषणा

“आम्ही एकमेकांशी…”, शाहरुख खानसोबतच्या वादावर अजय देवगणने सोडले मौन

“मी Irritable Bowel Syndrome आणि Colitis या दोन्ही आजाराने ग्रस्त आहे. त्यातच अचानक डायरियाचा (अतिसार) त्रास सुरु झाला. यावर उत्तम औषधोपचार केले, पण तरीही तो थांबला नाही. यामुळे मला रुग्णालयात दाखल करावे लागले. रुग्णालयात दाखल केल्यानंतरही मला सुस्थितीत येण्यासाठी ७ दिवस लागले”, असे त्यांनी ई टाईम्सशी बोलताना सांगितले.

यापुढे त्या म्हणाल्या, “यावेळी माझे पती मयूर माधवाने हे अमेरिकेत होते. त्यावेळी मी ते येथे यावेत यासाठी आग्रह धरला. पण त्यांनी मला तू खंबीर आहे, तू याचा व्यवस्थित सामना करशील, असे सांगितले. रुग्णालयात दाखल करतेवेळी मला माझ्या त्वचेमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला. इराणी असल्याने माझी त्वचा खूप नाजूक आहे.”

“जिथे जीव वाचवले जातात तिथं १५८ जीव मारण्याची परवानगी मिळतेच कशी?”, सायन रुग्णालयातील वृक्षतोडीवर अभिनेते सयाजी शिंदेचा संताप

“मला अतिसाराचा त्रास झाल्यानंतर आठवडाभर मला सलाईन लावण्यात आले होते. त्यावेळी रुग्णालय प्रशासनला माझ्या उजव्या हातातच सलाईन लावता येते होते. कारण २५ वर्षांपूर्वी स्तनाचा कर्करोगाचे निदान झाल्यानंतर माझ्या लिम्फ नोड्स काढून टाकण्यात आल्या होत्या. यादरम्यान मला प्रचंड त्रास सहन करावा लागला”, असेही मुमताज यांनी सांगितले.

दरम्यान ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटाने मुमताज यांच्या कारकिर्दीला कलाटणी दिली. चित्रपटसृष्टीत नावारुपास येत असतानाच या सौंदर्यवतीचं नाव काही सहकलाकरांशी जोडलं गेलं. संजय खान, फिरोज खान, देव आनंद आणि शम्मी कपूर या कलाकारांसोबत मुमताज यांच्या अफेअरच्या चर्चा होत्या.

पण, त्यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आलं ते म्हणजे शम्मी कपूरसोबतच्या बहुचर्चित रिलेशनशिपमुळे. १९७४ मध्ये त्यांनी मयूर माधवानी यांच्यासोबत लग्न केलं आणि त्यानंतर चित्रपटसृष्टीतूनही काढता पाय घेतला आणि त्या लंडनला स्थायिक झाल्या. सध्याच्या घडीला मुमताज चित्रपटसृष्टीपासून फार दूर असल्या तरीही त्यांचं चाहत्यांच्या मनातील स्थान मात्र कायम आहे.