एकेकाळच्या प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज काही दिवसांपूर्वीच त्यांची तब्येत बिघडल्यामुळे चर्चेत होत्या. अलिकडेच त्या रुग्णालयातून घरी परतल्या आहेत. त्यानंतर त्यांनी आपण एका गंभीर आजाराशी लढा देत आहेत. पण आता नुकत्याच दिलेल्या मुलखतीत त्यांनी स्वतःबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. सर्वांसमोर त्यांनी स्वतःचं एक गुपित उघड केलं आहे. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या लग्नानंतरच्या अफेअरबद्दल सांगितलं आहे. नुकतंच एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत मुमताज यांनी त्यांच्या अफेअरबद्दल सांगितलं जे त्यांनी पती मयूर मधवानीशी लग्न केल्यानंतर झालं होतं. त्या म्हणाल्या, "पुरुषांसाठी अफेअर करणं खूप सोपं असतं. माझ्या पतीची एका पेक्षा जास्त अफेअर्स नव्हती. मी त्याचा आदर करते कारण त्यानं याबाबत मला सांगितलं होतं. माझ्या पतीला अमेरिकेत एक मुलगी आवडली होती. त्यानं मला सांगितलं तू माझी पत्नी आहेस, मी तुझ्यावर प्रेम करतो आणि नेहमीच करत राहणार आहे. पण तुला कधीच सोडणार नाही." आणखी वाचा- “मला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही…” रणवीर सिंगचं टीकाकारांना सडेतोड उत्तर मुमताज पुढे म्हणाल्या, "हे सर्व आता आमच्या दोघांसाठी भूतकाळातील कहाणी आहे. आयुष्यात एकदा तर देवही माफ करतो. मी एखाद्या राणीसारखी राहिले. माझ्या पतीने मला कशाचीही उणीव भासू दिली नाही. पण माझ्या पतीच्या अफेअरनंतर मी एकटी पडले होते. मला खूप वाईट वाटायचं म्हणून मी भारतात परतले आणि इथे माझं एका व्यक्तीसोबत अफेअर झालं होतं. अर्थात ते फार गंभीर नव्हतं. फक्त काही काळासाठी आम्ही एकत्र होतो आणि लवकरच वेगळे झालो." आणखी वाचा- Video: सुहाना खानच्या डेब्यू चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, अमिताभ बच्चन यांनी शेअर केली खास पोस्ट अर्थात ही पहिलीच वेळ नाही की, मुमताज यांनी स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल अशाप्रकारचा खुलासा केला आहे. याआधीही त्यांनी एका मुलाखतीत, लग्नानंतर त्यांच्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचं मान्य केलं होतं. एवढंच नाही तर पतीच्या अफेअरनंतर स्वतःचेही विवाहबाह्य संबंध होते असंही सांगितलं होतं. दरम्यान काही दिवसांपूर्वी अचानक तब्येत बिघडल्यानं मुमताज यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आठवड्याभरानंतर आता त्या घरी परतल्या आहेत.