scorecardresearch

६०व्या वर्षीही ‘फ्रॉक का शौक’, अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल

सध्या हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे

६०व्या वर्षीही ‘फ्रॉक का शौक’, अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री नेहमीच ग्लॅमरस आणि अतिशय सुंदर अंदाजात दिसतात. चित्रपटांप्रमाणेच त्यांना बाहेर फिरताना देखील त्यांच्या लूकवर विशेष लक्ष द्यावे लागते. मग त्या एखाद्या ज्येष्ठ अभिनेत्री असल्या तरी त्यांचा सुंदर दिसण्यावर जास्त भर असतो. बॉलिवूडमध्ये अशाच एक अभिनेत्री आहेत ज्या वयाच्या ६०व्या वर्षी देखील फॅशन सेन्ससाठी ओळखल्या जातात. या अभिनेत्री सतत सोशल मीडियावर त्यांचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असतात.

या अभिनेत्री दुसऱ्या तिसऱ्या कुणी नसून नीना गुप्ता आहेत. नुकताच नीना गुप्ता यांनी त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांनी पिवळसर रंगाचा प्रिंटेड शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. तसेच हा फोटो शेअर करत त्यांनी ‘Frock का shock. गजराज सरांनी काढलेला फोटो’ असे कॅप्शनही दिले आहे. नीना यांच्या या लूकवर सर्वच फिदा झाले आहेत. या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या असून त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

Frock ka shock. Picture taken by the gajraj sir

A post shared by Neena Gupta (@neena_gupta) on

याआधी देखील नीना यांनी ग्लॅमरल लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नीना यांनी छोट्या पडद्यावर काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरूवात केली. छोट्या पडद्यावरील त्यांची लोकप्रिय पाहता त्यांना ‘नजदीकिया’, ‘मंडी’, ‘उत्सव’, ‘डॅडी’, ‘तेरे संग’, ‘दिल से दिया वचन’, अशा अनेक चित्रपटांत काम करण्याची संधी मिळाली.

आणखी वाचा : कंडोम बाळगा आणि बलात्काऱ्यांना सहकार्य करा म्हणणाऱ्याला कुकूचे सडेतोड उत्तर

नीना ज्याप्रमाणे बोल्ड दिसतात त्याचप्रमाणे त्यांचे विचारही बोल्ड आहेत. जगाचा विचार न करता त्या ८०च्या दशकात वेस्ट इंडियाचा माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्ससोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होत्या. त्यानंतर त्यांना मुलगी झाली.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या