scorecardresearch

Video : नीतू कपूर यांचा जावयाबरोबर भन्नाट डान्स, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नीतू कपूर यांचा जावयाबरोबरचा धमाल डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

Video : नीतू कपूर यांचा जावयाबरोबर भन्नाट डान्स, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
नीतू कपूर यांचा जावयाबरोबरचा धमाल डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

रणबीर कपूरची आई व अभिनेत्री नीतू कपूर या सोशल मीडियावर फारच सक्रिय असतात. इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे त्यांनी शेअर केलेले फोटो, व्हिडीओ नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. आतादेखील नीतू यांनी एक मजा-मस्ती करतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या चक्क आपल्या जावयाबरोबर डान्स करत आहेत. मुलाबरोबरच आपल्या जावयावरही नीतू यांचं प्रचंड प्रेम असल्याचं या व्हिडीओमधून दिसून येतं.

आणखी वाचा – लालबाग-काळाचौकी अन् चाळीतलं घर; कॉमेडी क्वीन नम्रता संभेरावचा खऱ्या आयुष्याबाबत खुलासा

नीतू यांची लेक रिद्धीमाचा पती भरत साहनीचा ४३वा वाढदिवस होता. कुटुंबियांनी मिळून भरत साहनीच्या वाढदिवसाचं धमाल सेलिब्रेशन केलं. नीतू यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये साहनी व त्या एका राजस्थानी गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. रेस्तराँमध्ये काही लोक राजस्थानी गाणी गात आहेत. हेच गाणं नीतू व त्यांचा जावई एण्जॉय करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

नीतू यांनी आपल्या जावयाबरोबरचा धम्माल व्हिडीओ शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. “भरत साहनी वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा” असं नीतू यांनी हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे. नीतू यांच्या चाहत्यांनीदेखील भरत साहनी यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.

आणखी वाचा – राहायला घर, पैसे नाही अन् उपाशी पोटी झोपली सनी देओलच्या चित्रपटामधील ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली, “मला अजूनही…”

२००६मध्ये रिद्धीमा व भरत साहनीचा लग्नसोहळा दिमाखात पार पडला. लंडनमध्ये रिद्धीमा शिक्षणासाठी गेली असता भरत साहनीची आणि तिची ओळख झाली. त्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करत लग्न करण्याचा निर्णय घेतला. भरत मला जेव्हा भेटतो तेव्हा माझ्यासाठी फुल घेऊन येतो असं नीतू यांनी डीएनएला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या