scorecardresearch

२७ वर्षांच्या करिअरला रामराम करत अभिनेत्रीने घेतला सन्यास; मुंबईतलं घर सोडून राहते हिमालयात

सन्यास घेतल्यानंतर ती आता हिमालयात राहत असल्याचंही समोर आलंय.

२७ वर्षांच्या करिअरला रामराम करत अभिनेत्रीने घेतला सन्यास; मुंबईतलं घर सोडून राहते हिमालयात
(संग्रहित फोटो)

टीव्ही अभिनेत्री आणि ‘दिया और बाती’ फेम नुपूर अलंकारने अभिनय जगतापासू संन्यास घेतला आहे. तसेच तिने स्वतःला सर्व प्रकारच्या मोहा-मायापासून दूर केलंय. अभिनेत्री आजकाल भगवे कपडे परिधान करून फिरत आहे. सन्यास घेतल्यानंतर ती आता हिमालयात राहत असल्याचंही समोर आलंय. तसेच तिने तिचं मुंबईतील घर भाड्याने दिल्याचंही कळतंय. आपला नेहमीच अध्यात्माकडे कल असल्याचे नुपूरने सांगितले होते. सध्या ती अध्यात्माचा अवलंब करत असून तिने स्वतःला त्यात पूर्णपणे वाहून घेतलंय.

हेही वाचा – आईला वाचवण्यासाठी राजू श्रीवास्तव यांची मुलगी भिडली होती गुंडांशी; जाणून घ्या अंतराबद्दल ‘या’ गोष्टी

ETimes शी बोलताना अभिनेत्री म्हणाली, “मी माझं आधीचं आयुष्य मिस करत नाही. माझ्या आयुष्यात कधीही कोणत्याच प्रकारचा ड्रामा नव्हता. मी चित्रपटसृष्टीत असताना मला लोकप्रियता आणि यशाची चिंता होती. पण आता मला कशाचीच चिंता नसून माझ्या जीवनात शांतता आहे.” दरम्यान, नुपूरने पती अलंकार श्रीवास्तवशी सर्व संबंध तोडत असल्याची माहिती दिली आहे. तिच्या पतीने तिला अध्यात्माच्या मार्गावर चालण्यासाठी सर्व नातेसंबंधातून मोकळं केलंय, असं ती म्हणाली. परंतु दोघे अद्याप कायदेशीररित्या वेगळे झालेले नाहीत. दोघांनीही एकमेकांपासून घटस्फोट घेतलेला नाही.

हेही वाचा – व्हॅलेन्सियाच्या रस्त्यांवर रोमँटिक पोज; पाहा नयनतारा आणि विग्नेशच्या स्पेन ट्रीपचे खास फोटो

याआधीही नुपूर शर्मा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. २०१९ मध्ये, आर्थिक स्थिती खूपच खराब झाली असून दैनंदिन खर्च भागवणंही कठीण झालंय. तसेच आर्थिक अडचणींमुळे घर गहाण ठेवण्याचा विचार करत असल्याचे अभिनेत्रीने सांगितले होते. नुपूरने ‘दिया और बाती’, दूरदर्शनवरील प्रसिद्ध शो ‘शक्तिमान’, ‘तंत्र’ आणि ‘घर की लक्ष्मी बेटियां’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय. याशिवाय तिने काही चित्रपटांमध्येही काम केलंय.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.