अभिनय क्षेत्रातून राजकारणात आलेल्या खुशबू सुंदर या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अलीकडेच त्यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. खुशबू यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल काही खुलासे केले आहेत. त्या आठ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांनी लैंगिक शोषण केलं होतं, असं खुशबू सुंदर यांनी सांगितलं आहे. खुशबू सुंदर या भाजपा नेत्या आहेत.

MC Stan च्या कॉन्सर्टमध्ये शिव ठाकरेचीच हवा; सुंबूलबरोबर केला जबरदस्त डान्स, Video पाहिलात का?

happiness hashtag, balmaifal happiness
सुखाचे हॅशटॅग: गोष्ट छोटीशी, पण महत्त्वाची!
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे

खुशबू यांनी बरखा दत्त यांना एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आयुष्यातील या दुर्दैवी घटनेचा खुलासा केला. “मला वाटतं जेव्हा एखाद्या मुलावर अत्याचार होतो, तेव्हा त्या घटनेचा आघात मुलावर आयुष्यभर राहतो. हे मुलगा किंवा मुलीबद्दल नाही. माझ्या आईने तिच्या वैवाहिक जीवनात फक्त अपमान आणि मार सहन केला होता. बायकोला मारहाण करणे, मुलांना मारहाण करणे, एकुलत्या एक मुलीवर लैंगिक अत्याचार करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे असे मानणारा माणूस माझा पिता होता. माझ्यावर अत्याचार सुरू झाले तेव्हा मी फक्त आठ वर्षांची होते आणि मी १५ वर्षांची असताना त्याच्याविरुद्ध बोलण्याचे धाडस केले होते,” असं खूशबू सुंदर म्हणाल्या.

एक अशी वेळ आली आयुष्यात की स्वतःसाठी ठामपणे उभं राहावं लागलं, कारण आपल्यामुळे घरातील इतर सदस्यांवर अत्याचार होण्याची भीती हे मी अनेक वर्षे गप्प राहण्यामागचं एक कारण होतं, असं त्यांनी सांगितलं. “हे सर्व घडत असताना मला एक भीती कायम असायची की जर या गोष्टी मी आईला सांगितल्या, तर कदाचित ती माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. कारण, मी तिला त्या वातावरणात पाहिलं आहे जिथे काहीही झालं तरी पती परमेश्वर आहे, अशी मानसिकता होती. पण १५ व्या वर्षी मला वाटलं, आता खूप झालं आणि मी त्याच्याविरुद्ध बंड करू लागले. मी १६ वर्षांचेही नव्हते, जेव्हा त्याने आम्हाला होतो त्या परिस्थितीत सोडलं. पुढच्या वेळचं जेवण कुठून येईल, हेही आम्हाला माहीत नव्हते,” असं खुशबू सुंदर तेव्हाचा काळ आठवत म्हणाल्या.

अभिनेत्याशी लग्न करण्यासाठी अंजलीने बदललेला धर्म; वाचा नवाजुद्दीन सिद्दीकी व आलियाची अनोखी Love Story

दरम्यान, ‘द बर्निंग ट्रेन’ या बॉलिवूड चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या खुशबू यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांनी २०१० मध्ये राजकारणात प्रवेश केला होता.

Live Updates