कोरोना लस न घेण्याचा निर्णय अंगलट, अभिनेत्री पूजा बेदी कोरोना पॉझिटिव्ह

पूजा बेदीने काही दिवसांपूर्वी कोरोना लस घेणार नाही असे जाहीर केले होते.

देशात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. तर दुसरीकडे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बेदीला कोरोनाची लागण झाली आहे. तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंडही कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे. पूजा बेदीने काही दिवसांपूर्वी कोरोना लस घेणार नाही असे जाहीर केले होते. मात्र आता ती स्वत:च्या कोरोनाच्या विळख्यात अडकली आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत रविवारी कोरोनामुळे एकाही रुग्णांचा मृत्यू झाली नसल्याची नोंद करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून मुंबई सर्वाधिक रुग्ण आणि मृतांची नोंद करण्यात येत होती. मात्र आता संपूर्ण राज्याच्या तुलनेत मुंबईत आतापर्यंत एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मुंबईत लसीकरण मोहीम जोरात सुरु असताना दुसरीकडे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बेदीनं कोरोना लस घेणार नाही, असा निर्णय घेतला होता. मात्र तिचा हा निर्णय अंगलट आला आहे. कारण नुकतंच तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

पूजाने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. “मला कोरोनाची लागण झाली आहे. माझ्यासोबतच माझा बॉयफ्रेंड आणि काम करणारी मोलकरीण यांनाही कोरोना झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मला काही अलर्जी झाली होती. यानंतर मला अचानक खोकला सुरु झाला. त्यासोबतच तापही येत होतो. यामुळे मी कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. नुकतंच कोरोना चाचणी केली असता, ती पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले,” असे तिने सांगितले.

यापुढे पूजा म्हणाली की, “मी कोरोनापासून वाचण्यासाठी कोणतीही लस घेणार नाही. त्याउलट नैसर्गिक प्रतिकारशक्ती, पर्यायी उपचारपद्धती आणि निरोगी उपायांनी कोरोना बरा होऊ शकतो. कोरोना हा बरा होतो. त्यामुळे घाबरुन जाऊ नका,” असे आवाहन तिने या व्हिडीओद्वारे केले आहे.

“यानंतर तिने या व्हिडीओत कोरोना काळात आपण काय खाऊ शकतो आणि काय नाही याची माहिती दिली आहे. यात तिने उसाचा रस, काढा, ताजी फळं, वाफ घेणे आणि कार्बोल टॅबलेट घेऊ शकता, असे पूजा म्हणाली. त्यासोबत पाण्यात मीठा टाकून त्यातून गुळण्या करा,” अशा सूचनाही तिने केल्या आहेत.

दरम्यान अभिनेत्री पूजा बेदीने जानेवारी महिन्यात कोरोना लसीवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. यावेळी तिने हे प्रश्न उपस्थित करत WHO आणि फायझर कंपनीला टॅग केले होते. यानंतर आता मात्र कोरोना लस न घेणे तिच्याच अंगलट आल्याचे दिसत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Actress pooja bedi tests covid19 positive she was refuses to get vaccinated nrp

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या