गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीत ‘रानबाजार’ या वेबसिरीजची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच या वेबसीरिजचा टीझर प्रदर्शित झाला. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसीरिजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळत आहे. या वेबसीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत असलेल्या अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित आहेत. या वेबसीरिजमध्ये त्या दोघांचा खूप बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे. यावरुन प्राजक्ताला अनेकदा ट्रोल केलं जात आहे. मात्र नुकतंच तिने या सीरिजच्या शूटींगआधीचा एक किस्सा सांगितला आहे.

अभिजित पानसे दिग्दर्शित ‘रानबाजार’ या वेबसीरिजच्या ८ भागांपैकी ६ भाग प्रदर्शित झाले आहेत. या वेबसीरिजचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून ती सातत्याने चर्चेत आहे. त्यात सोज्वळ प्राजक्ताचा बोल्ड लूक पाहून प्रेक्षक आश्चर्य व्यक्त करत आहेत. या वेबसीरिजसाठी प्राजक्ताने चक्क ११ किलो वजन वाढवलं आहे. हे वजन वाढवण्यासाठी तिला फार मेहनत करावी लागली. नुकंतच एका मुलाखतीत बोलताना प्राजक्ताने वेबसीरिजसाठी वजन वाढवण्याबद्दल भाष्य केले.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
scorching heat
उन्हाच्या झळांनी हापूस आंबा काळवंडला; डाळिंब, द्राक्ष, भाजीपाल्यावर परिणाम

“सतत काहीतरी नवं करण्याची इच्छा…”, अभिनेत्री प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ता म्हणाली,”जेव्हा मला वजन वाढवायचं होतं, तेव्हा मी शरीराला फार सवयी लावून घेतल्या होत्या. त्यानंतर माझं शरीर जास्त अन्न घेत नव्हतं. मी अतिप्रमाणात खात होते. त्यामुळे मला अनेकदा जुलाब, उलट्या व्हायच्या. माझे शरीर अतिरिक्त खाणे स्विकारत नव्हते. त्यामुळे त्यातून सर्व बाहेर पडत होते. पण हळूहळू मला सवय लावावी लागली.”

“आत्तूच्या शहरी…”, प्राजक्ता माळीची भाची करते जिवाची मुंबई; फोटो व्हायरल

अभिजित पानसे दिग्दर्शित पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या भव्य वेबसिरीजची निर्मिती अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, रावण फ्युचर प्रॉडक्शन्स आणि अभिजित पानसे,अनिता पालांडे यांनी केली आहे. गेल्या २० मे रोजी ‘रानबाजार’ वेबसीरिज ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर प्रदर्शित झाली आहे. या वेबसीरिजला सध्या प्रेक्षकांचा फार चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावर अनेकांनी कमेंट करत ती वेबसीरिज कशी वाटली याबद्दल सांगितले आहे.