scorecardresearch

मालिका संपताच साध्याभोळ्या नेहाचा ग्लॅमरस अंदाज पाहिलात का? क्रॉप टॉपमधला व्हिडीओ केला शेअर

प्रार्थना मूळची बडोद्याची असून तिने करियर करण्यासाठी मुंबई गाठली

मालिका संपताच साध्याभोळ्या नेहाचा ग्लॅमरस अंदाज पाहिलात का? क्रॉप टॉपमधला व्हिडीओ केला शेअर
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या चर्चेत आहे. नुकताच तिच्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत तिने नेहा नावाचे पात्र साकारले होते. या मालिकेने तिला भरभरून प्रेम दिले, तिने साकारलेल्या एका छोट्या मुलीच्या आईचे कौतुकदेखील झाले. या मालिकेत प्रेक्षकांना तिचा साधेपणा आवडला. मालिका संपल्यानंतर नुकताच तिने आपल्या ग्लॅमर्स अंदाज दाखवला आहे.

प्रार्थना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. ती आपले ग्लॅमर्स फोटो शेअर करत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने गुलाबी रंगाचा क्रॉप टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे. साजेसा मेकअप व केस मोकळे सोडून प्रार्थनाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तसेच कलाकारांनी कॉमेंट्स केल्या आहेत.

गौतमी पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश; नेमकं प्रकरण काय?

प्रार्थनाच्या फोटोना नेहमीच चाहते तिचे पसंती दर्शवतात, एकाने लिहले आहे खूप छान दिसत आहेस, दुसऱ्याने लिहले आहे,” बोल्ड अंदाज पहिल्यांदाच पहिला एकाने लिहले आहे”, “मस्त दिसतेस”, मात्र एकाने लिहले आहे “झोपेतून उठल्यासारखी दिसतेस थोडा मेकअप करत जा” अशी सूचना दिली आहे.

‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रार्थनाने मराठी चित्रपटातदेखील काम केले आहे. ‘मितवा’, ‘मिस्टर अँड मिस्टर सदाचारी’, ‘कॉफी आणि बरंच काही’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटात तिने काम केले आहे. प्रार्थना मूळची बडोद्याची असून तिने करियर करण्यासाठी मुंबई गाठली.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-01-2023 at 14:50 IST

संबंधित बातम्या