प्रियांका चोप्राने २०००मध्ये मिस वर्ल्डचा किताब पटकावला. वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी तिला हे यश मिळालं. आज तिने फक्त बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्येही स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. सध्या जरी ती हॉलिवूडमध्ये व्यस्त असली तरी भारतीय परंपरा विसरलेली नाही. सध्या एकूणच जगभरात ऑस्करची चर्चा सुरु आहे. पाकिस्तानकडून जो चित्रपट ऑस्करसाठी निवडला गेला आहे त्या चित्रपटाचं प्रियांकाने कौतुक केलं आहे.

‘जॉयलँड’ या पाकिस्तानी चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. प्रियांका चोप्राने बुधवारी सोशल मीडियावर चित्रपटाचे कौतुक केले आणि हा चित्रपट पाहावा असे म्हटले. ‘जॉयलँड’ सध्या ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट श्रेणीसाठी १० चित्रपटांच्या शॉर्टलिस्टमध्ये आहे, जिथे तो ‘छेल्लो शो’ (शेवटचा चित्रपट शो) या भारतीय चित्रपटाशी स्पर्धा करत आहे.

Mumtaz urges on lifting ban on Pakistani artists in India
“आपल्या चित्रपटसृष्टीत प्रतिभावान…”, पाकिस्तान भेटीनंतर बॉलीवूड अभिनेत्रीने केलं तिथल्या कलाकारांचं कौतुक
Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
three khans conspired to get actors like Fawad Khan banned in India
फवाद खानसारख्या कलाकारांवर बंदी घालण्यासाठी कट रचला, पाकिस्तानी अभिनेत्रीचे तिन्ही खानवर गंभीर आरोप

‘द काश्मीर फाइल्स’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार; दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री ट्वीट करत म्हणाले…

प्रियांकाने बुधवारी सकाळी इन्स्टाग्राम स्टोरीजवर चित्रपटाच्या ट्रेलरचा व्हिडिओ शेअर केला. त्यावर कॅप्शन लिहला “जॉयलँड पाहणे खरोखर आनंददायक आहे. ही कथा जिवंत केल्याबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन, हा चित्रपट नक्की बघा.” तिने तिच्या पोस्टमध्ये चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांच्या काही सदस्यांना टॅग केले.

‘जॉयलँड’ हा ऑस्करसाठी निवडला गेलेला पहिला चित्रपट आहे. एका कुटुंबातील तरुण मुलगा मादक नृत्य करणाऱ्या एका ट्रान्स महिलेच्या प्रेमात पडतो आणि तिच्यासाठी तो त्याचं आहे ते आयुष्य बाजूला ठेवायला तयार होतो. अशी या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटाला पाकिस्तान सरकारनेच बंदी घातली होती.