बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. प्रियांका ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. प्रियांका चोप्रा ही नेहमी तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. नुकतंच प्रियांकाने हॉलिवूडबद्दल एक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

प्रियांकाने नुकतंच ‘पिंकविला’ या वेबसाईटला मुलाखत दिली. यावेळी तिला हॉलिवूडमध्ये काम करण्याचा अनुभव विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, “मला हॉलिवूडमधील सिनेसृष्टीबाबत खूप काही शिकायचे आहे. तिथे मला अजून बऱ्याच गोष्टी साध्य करायच्या आहेत. मला इथे १० वर्षानंतर हवी ती भूमिका साकारत आली.”
आणखी वाचा : प्रियांका चोप्रा आणि निक जोनसने बाळासाठी सरोगसीचा पर्याय का निवडला? समोर आले कारण

pushkar shrotri reacts on chinmay mandlekar trolling incident
“मुलाचं नाव जहांगीर ठेवलं म्हणून…”, चिन्मय मांडलेकर ट्रोलिंग प्रकरणावर पुष्कर श्रोत्रीचं स्पष्ट मत; म्हणाला, “इतिहास चाचपडून बघा”
Saara Kahi Tichyasathi Fame Actor Abhishek Gaonkar first engagement video viral
Video: जबरदस्त डान्स अन् बरंच काही…; ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेत्याचा ‘असा’ पार पडला साखरपुडा, पाहा पहिला व्हिडीओ
banned films because of bold scenes
बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी
Manoj Bajpayee father auditioned at FTII
NSD मध्ये रिजेक्ट झालेल्या अभिनेत्याच्या वडिलांनी FTII मध्ये दिली होती ऑडिशन, धर्मेंद्र अन् मनोज कुमार होते उपस्थित, वाचा किस्सा

“मी नेहमीच प्रत्येक गोष्टीत यश मिळवत आली आहे. माझे आयुष्यात एकच ध्येय नाही. मला आव्हान घ्यायला आवडतात. त्यासोबतच मला माझ्या ज्ञानात होणारी वाढही कायम आवडते”, असे प्रियांकाने सांगितले.

“जेव्हा तुम्ही या सर्व गोष्टी एकत्र करता तेव्हाच अनेक गोष्टी साध्य होतात. मला हॉलिवूडमध्ये खूप काही करायचे आहे. मी बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक आघाडीच्या चित्रपट निर्मात्यांसोबत काम केले आहे. मी असे चित्रपट केले आहेत ज्यांचा मला खरोखर अभिमान आहे. आता एक अभिनेत्री म्हणून मला हॉलिवूडमध्येही तेच करायचे आहे जे मी भारतात केले आहे”, असेही प्रियांकाने म्हटले.

“एक अभिनेत्री म्हणून मी अजूनही इथे नवीन आहे. मी या सिनेसृष्टीत १० वर्ष काम केल्यानंतर आता कुठे एका ठराविक टप्प्यावर पोहोचली आहे. या टप्प्यावर पोहोचल्यानंतर मला ज्या प्रकारच्या भूमिका करायच्या आहेत, त्या मी करत आहे. मी या इंडस्ट्रीसाठी खूप मेहनत केली आहे आणि इथे काम करत असलेल्या लोकांवर माझा पूर्ण विश्वास आहे.” असेही प्रियांकाने सांगितले.

आणखी वाचा : आई मधू चोप्राच्या वाढदिवसानिमित्त प्रियांका चोप्राची खास पोस्ट, म्हणाली…

दरम्यान सध्या प्रियांका ही तिच्या ‘सिटाडेल’ या हॉलिवूड वेबसीरिजच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. याचे दिग्दर्शन ‘अ‍ॅव्हेंजर्स’ फेम रुसो बंधू करत आहे. तिच्यासोबत या वेबसीरिजमध्ये रिचर्ड मॅडेन देखील दिसणार आहे. त्यासोबत ती ‘जी ले जरा’ या चित्रपटाचे शूटिंगमध्येही व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे.