‘पुष्पा’ चित्रपटामुळे घराघरात पोहचलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना. आपल्या लूकमुळे कायमच चर्चेत असते. आता या चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे या भागातदेखील अल्लू बरोबर रश्मिका दिसणार आहे. केवळ दाक्षिणात्य चित्रपटचं नव्हे तर बॉलिवूड चित्रपटातदेखील काम करू लागली आहे. गुडबाय चित्रपटात ती झळकली होती. नुकताच तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात तिने बाईकस्वारांना तिने तंबी दिली आहे.
अभिनेत्री नुकतीच चेन्नई येथे गेली होती तिचा आगामी तमिळ बिग-बजेट ‘वारिसू’ या चित्रपटाच्या ऑडिओ लॉन्चचा कार्यक्रम होता. २४ डिसेंबर रोजी चेन्नईच्या नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये वारिसूचे ऑडिओ लॉन्च करण्यात आले. कार्यक्रम संपल्यानंतर, रश्मिका तिच्या गाडीतून हॉटेलकडे परत जात असताना तिला जाणवले की तिचे चाहते त्यांच्या बाइकवरून तिचा पाठलाग करत आहेत.
रश्मिकाच्या हे लक्षात येताच तिने गाडी थांबवली आणि आणि चाहत्यांना सांगितले की कृपया हेल्मटचा वापर करा. चाहत्यांनी ते मान्य केले आणि दोघे निघून गेले. रश्मिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे.
‘गुडबाय’ चित्रपटानंतर ती आता ‘मिशन मजनू’ या चित्रपटात दिसणार आहे. नुकतीच या चित्रपटाची झलक पाहायला मिळाली. या चित्रपटात तिच्याबरोबर सिद्धार्थ मलहोत्रा दिसणार आहे. या चित्रपटाची कथा १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धावर बेतलेली आहे.