आज सुपरस्टार अल्लू अर्जुन याचा वाढदिवस आहे.सध्या तो त्याच्या आगामी ‘पुष्पा-२ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने त्याला एक वेगळी ओळख दिली. या चित्रपटातील श्रीवल्ली आणि पुष्पाची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना खूप आवडली. तर आज त्याच्या वाढदिवसानिमित्त श्रीवल्लीने म्हणजेच रश्मिका मंदानाने अल्लू अर्जुनसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुन यांची ‘पुष्पा’ चित्रपटातील सुपरहिट जोडी आता लवकरच ‘पुष्पा २’मध्येही दिसणार आहे. ‘पुष्पा’ या चित्रपटाच्या निमित्ताने त्या दोघांमध्ये खूप छान बॉण्डिंग झालं. तर अनेकदा ते एकमेकांच्या कामाचं भरभरून कौतुकही करताना दिसतात. आज अल्लू अर्जुनला रश्मिकाने वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

hotel Solapur district
सोलापूर : हॉटेल व्यवस्थापनाच्या नावाखाली मित्राला ६८ लाखांचा गंडा, अक्कलकोटमध्ये दागिने लंपास
Anant Radhika's Pre-Wedding Ceremony Updates in Marathi
MS Dhoni : माही साक्षीसह अनंत राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जामनगरला रवाना, VIDEO होतोय व्हायरल
anant ambani and radhika marchant wedding guest will get hand made candle
अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री वेडिंगसाठी जामनगरच का निवडले? ‘या’ शहराशी अंबानी कुटुंबाचा आहे जवळचा संबंध
pm Modi Yavatmal
पंतप्रधानांची यवतमाळमध्ये सभा, पोलिसांनी कशासाठी बजावली नोटीस?

आणखी वाचा : Pushpa 2 Teaser: दंगली, जाळपोळ, पुष्पाचा शोध अन्…; ‘पुष्पा २’चा उत्कंठावर्धक टीझर प्रदर्शित

रश्मिका मंदानाने तिचा आणि अल्लू अर्जुनचा एक फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. हा फोटो शेअर करत तिने लिहिलं, “माझा पुष्पराज, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. संपूर्ण जग तुला पुन्हा पुष्पाच्या रूपात पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहे आणि मला आशा आहे की ते तुझ्यावर खूप प्रेम करतील. तुम्हाला खूप सारं प्रेम सर.” तर तिचा हा स्टेटस रिपोस्ट करत अल्लू अर्जुननेही तिला त्याच अंदाजात उत्तर दिलं. ही स्टोरी शेअर करत त्याने लिहिलं, “धन्यवाद श्रीवल्ली.”

हेही वाचा : Video: …अन् श्रीवल्ली मराठीत बोलू लागली, रश्मिका मंदानाचा मराठमोळा अंदाज चर्चेत

आता त्यांची ही ऑफस्क्रीन केमिस्ट्री चांगलीच चर्चेत आली आहे. दरम्यान कालच ‘पुष्पा २’चा टीझर प्रदर्शित झाला. या टीझरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता प्रेक्षक पुन्हा एकदा पुष्पा आणि श्रीवल्लीला एकत्र पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.