“अभिनेत्रींना समान वागणूक मिळत नाही कारण…” मराठी चित्रपटसृष्टीबाबत सई ताम्हणकरचं स्पष्ट मत

अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेत्रींना समान वागणूक मिळते का? याबाबत स्पष्ट मत मांडलं आहे.

Sai Tamhankar Sai Tamhankar Interview
अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेत्रींना समान वागणूक मिळते का? याबाबत स्पष्ट मत मांडलं आहे.

मराठीमधील बोल्ड अन् बिनधास्त अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सईने फक्त मराठी चित्रपट, मालिका, वेबसीरिमध्ये अडकून न राहता हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं. हिंदी चित्रपटांमध्ये काम करत तिने पुन्हा एकदा स्वतःला अभिनेत्री म्हणून सिद्ध केलं. आज ती मराठीमधील आघाडीची अभिनेत्री आहे. कोणत्याही विषयावर आपलं स्पष्ट मत मांडणं ही सईची खासियत आहे. सईने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मराठी चित्रपटसृष्टीबाबत काही खुलासे केले आहेत.

आणखी वाचा – Viral: ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील…’ , किशोर कदमांची राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारी कविता

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेत्रींना कशी वागणूक मिळते? अभिनेत्रींचा मानधनाचा मुद्दा याबाबत सईने आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. सईने जागरण डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीमध्ये मराठी चित्रपटसृष्टीमधील आताची परिस्थिती काय आहे? याबाबत सांगितलं. सई म्हणाली, “मी मराठी चित्रपटसृष्टीमधून आहे. मला इतर चित्रपटसृष्टीबाबत माहित नाही. पण मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेत्रींना समान वागणूक मिळत नाही. आजही अभिनेत्यांच्या तुलनेमध्ये मराठी अभिनेत्रींना कमी मानधन मिळतं. मी खूप आधी याबाबत बोलले होते. पण त्याचा आजपर्यंत काहीच फायदा झाला नाही.”

पुढे बोलताना ती म्हणाली, “एखाद्या भूमिकेसाठी अभिनेत्री देखील तितकीच मेहनत घेते जितकी एखादा अभिनेता मेहनत करत असेल. मी या मुद्द्यावर पुन्हा माझं मत मांडण्याचा प्रयत्न करेन. जेणेकरुन निर्माण झालेल्या या परिस्थितीमध्ये काही सुधारणा होईल. खरं तर मराठी चित्रपटसृष्टीमधील सगळ्या अभिनेत्री एकत्र आल्या तर याविरुद्ध लढणं सोपं होईल. त्यातून काहीतरी मार्ग निघेल. पण एकच अभिनेत्री जर बोलत असेल तर त्याचा निर्माते-दिग्दर्शकांवर कोणताच परिणाम होत नाही. कारण इतर अभिनेत्री मिळेल त्या मानधनामध्ये काम करतात.”

आणखी वाचा – “हिंदूंनो जागे व्हा…”; उदयपूर हत्या प्रकरणाबाबत शरद पोंक्षे यांनी शेअर केलेली पोस्ट चर्चेत

अभिनेत्रींना देखील चित्रपटसृष्टीमध्ये समान वागणूक मिळाली पाहिजे असं सईचं स्पष्ट मत आहे. खरं तर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एकजुटीची गरज आहे हे सईच्या बोलण्यामधून स्पष्ट होतं. फक्त मराठीमध्येच नव्हे तर बॉलिवूडमध्येही यापूर्वी हेच चित्र पाहायला मिळालं. पण आता प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, कंगना रणौतसारख्या अभिनेत्री अभिनेत्यांच्याबरोबरीने मानधन घेतात.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress sai tamhankar talk about marathi film actress did not get equal pay for movie see more details kmd

Next Story
समीर चौगुलेच्या वाढदिवसानिमित्त प्रसाद ओकची खास पोस्ट, म्हणाला “तुझी वाक्यं छातीवर…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी