दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. समांथा अनेकदा सोशल मीडियावरुन व्यक्त होताना दिसते. चाहत्यांना उत्तर देण्याबरोबरच तिच्या कामाबाबतची माहितीही ती शेअर करत असते. आता समांथाने महिलांना ट्रोल करणाऱ्या एका व्यक्तीला सडेतोड उत्तर दिलं आहे.

एका चाहत्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन चेन्नईतील वेट्री चित्रपटगृहाचा फोटो शेअर केला होता. या चित्रपटगृहाच्या भिंतीवर लागलेल्या चित्रपटांच्या पोस्टरवर अभिनेत्री होत्या. “वेट्री चित्रपटगृहाच्या बाहेर लावलेल्या चित्रपटांच्या या पोस्टरमध्ये महिला(अभिनेत्री) मुख्य भूमिकेत असल्याचं मला व माझ्या बहिणीला जाणवलं. तमिळ सिनेमा खूप प्रगती केली आहे. दहा वर्षांपूर्वी असा विचारही कोणी करू शकलं नसेल”, असं त्या युजरने ट्वीटमध्ये म्हटलं होतं. या ट्वीटवर समांथाने “महिला उंच भरारी घेत आहेत”, असा रिप्लाय केला होता.

MP Sanjay Singh says it is time to say goodbye to BJP
खासदार संजयसिंग म्हणतात, ‘भाजपला निरोप देण्याची वेळ’
Navneet Rana Answer to Sanjay Raut
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

हेही वाचा>> “तिच्यासारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला…”, चित्रा वाघ व उर्फी जावेद वादात सुषमा अंधारेंची उडी

समांथाच्या या ट्वीटवर दुसऱ्या एका युजरने रिप्लाय केला होता. “हो, फक्त खाली पडण्यासाठी”, असं त्याने ट्वीटमध्ये म्हटलं होतं. महिलांना हिणवणाऱ्या त्यांना कमी लेखणाऱ्या या युजरला समांथाने शालजोड्यातून उत्तर दिलं आहे. “पुन्हा उंच भरारी घेणं, हे अधिक सुखदायक असतं”, असं म्हणत समांथाने महिलांना ट्रोल करणाऱ्या युजरला सुनावलं.

हेही वाचा>> “मी तयार नव्हते…”, लग्नानंतर महिन्याभरातच पाठकबाईंचा खुलासा

चेन्नईतील चित्रपटगृहाच्या भिंतीवर ऐश्वर्या राजेश (ड्रायव्हर जमुना), नयनतारा (कनेक्ट), तृषा (रंगी), कोवई सेरला (सेंबी) या चित्रपटांचे पोस्टर होते. या सगळे चित्रपट महिलांवर आधारित असून या चित्रपटांत अभिनेत्री मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत.