समांथा रुथ प्रभू व नागाचैतन्य सध्या त्यांच्या नात्यामुळे खूप चर्चेत आहेत. २०१७मध्ये टी दोघं लग्नाच्या बेडीत अडकली. आदर्श कपल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. पण त्यांचं नातं फार टिकलं नाही आणि २०२१ मध्ये नागाचैतन्य व समांथाने घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटाची बातमी कळताच त्यांच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला होता. तर आता नागाचैतन्य प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. यावर समांथाने प्रतिक्रियाही दिली असल्याचं समोर आलं होतं. पण आता तिने याबाबत मोठा खुलासा तिने केला आहे. नागाचैतन्यचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री शोभिता धुलिपालाही दिसत होती. या फोटोनंतर नागाचैतन्य शोभिता धुलिपाला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर त्याची पूर्वाश्रमीची पत्नी समांथाची प्रतिक्रिया देखील समोर आली होती. पण आता तिने मौन सोडलं आहे. आणखी वाचा : ‘शकुंतलम’ चित्रपटासाठी समांथा रुथ प्रभूने परिधान केले तब्बल ‘इतक्या’ कोटींचे दागिने, आकडा वाचून व्हाल थक्क नागाचैतन्यच्या डेटिंगच्या चर्चांवर “कोण कोणाबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे, या गोष्टीमुळे मला फरक पडत नाही. ज्या व्यक्तींना प्रेमाची किंमत नसते त्यांनी कितीही लोकांना डेट केलं तरी शेवटी डोळ्यांत अश्रूच येतात. ती मुलगी आनंदी असली पाहिजे” अशी प्रतिक्रिया समांथाने दिली असल्याचं समोर आलं होतं. पण आता तिने हे विधान ट्वीट करत ती असं काहीही बोलेलली नाही, असा खुलासा तिने केला आहे. https://twitter.com/Samanthaprabhu2/status/1643135242025283585?t=BztGQR66Kwwzl5tnIS8WVQ&s=08 हेही वाचा : समांथा रुथ प्रभूने मुंबईत खरेदी केलं नवं आलिशान घर, किंमत वाचून व्हाल थक्क तिच्या या ट्वीटने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर या ट्वीटवर तिचे चाहते कमेंट करत विविध प्रतिक्रिया देत आहेत. तिचं हे ट्वीट सध्या चांगलंच व्हायरल होत आहे.