Premium

Video: शेफाली शाहने पाहिलं रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वेचं ‘चारचौघी’ नाटक, मराठीत प्रतिक्रिया देत म्हणाली, “सगळ्या कलाकारांची कामं…”

बॉलीवूड अभिनेत्री आणि ओटीटी स्टार शेफाली शाह नुकतीच या नाटकाच्या प्रयोगाला उपस्थित होती.

Shefali

सध्या अनेक मराठी नाटकांना प्रेक्षक गर्दी करत आहेत. रंगभूमीवर सुरू असलेल्या अनेक नाटकांचे प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक केलं जात आहे. यापैकीच एक नाटक म्हणजे ‘चारचौघी.’ बॉलीवूड अभिनेत्री शेफाली शाह हिने हे नाटक पाहिलं आणि ते मंत्रमुग्ध झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘चारचौघी’ या नाटकात रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे, पर्ण पेठे, कादंबरी कदम या प्रमुख भूमिकेत आहेत. तर श्रेयस राजे, पार्थ केतकर, निनाद लिमये या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चंद्रकांत कुलकर्णी यांनी या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे. बॉलीवूड अभिनेत्री आणि ओटीटी स्टार शेफाली शाह नुकतीच या नाटकाच्या प्रयोगाला उपस्थित होती. तिने हे नाटक पाहिलं आणि ती भारावून गेली.

हेही वाचा : “तुमचे डोळे खूप थकलेले दिसत आहेत,” चाहत्याच्या प्रश्नावर मुक्ता बर्वेचं स्पष्ट उत्तर, स्वतःच्या तब्येतीची माहिती देत म्हणाली…

हे नाटक पाहिल्यावर तिने मराठीत प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, “मी आत्ताच चारचौघी हे नाटक पाहिलं आणि मी भारावून गेले आहे. खूप सुंदर, खूप नाजूक… इतक्या वर्षांनी हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आलं आहे आणि आजही ते तितकंच मनाला भिडतं. सगळ्या कलाकारांची कामं आणि या नाटकाचं लिखाण पाहून मी नि:शब्द झाले आहे. मला खूप आनंद होतोय आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला या नाटकाचा सुंदर अविष्कार बघण्याची संधी मिळाली.”

आणखी वाचा : Video: “बालगंधर्व नाट्यगृहात डास, अस्वच्छता, पण वाशीचं विष्णुदास भावे नाट्यगृहं…,” मुक्ता बर्वेने व्हिडीओ शेअर करत केलं कौतुक

शेफाली शाहचा हा व्हिडिओ आता चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत या नाटकाचे तर सर्वजण कौतुक करत आहेतच पण त्याबरोबरच शेफालीला अस्खलित मराठी बोलताना पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress shefali shah watches mukta barve starter charchaughi natak gives her reaction rnv

First published on: 05-10-2023 at 12:26 IST
Next Story
रणबीर कपूर आरोपी नाही, तर…; ईडीने अभिनेत्याला समन्स बजावल्याचं कारण समोर