अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. शिल्पा शेट्टीने २००७ साली राजस्थानमध्ये एका कार्यक्रमादरम्यान हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरेने किस केले होते. त्यानंतर शिल्पा शेट्टीवर सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान तब्बल १५ वर्षानंतर याप्रकरणी शिल्पा शेट्टीला न्यायालयाने माफ केले आहे. मुंबईतील एका न्यायालयाने तिची निर्दोष मुक्तता केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महानगर दंडाधिकारी केतकी चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा शेट्टीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याबाबतचा सविस्तर आदेश सोमवारी जारी करण्यात आला आहे. या घटनेनंतर शिल्पाने आपली भूमिका स्पष्ट केली होती. या प्रकरणाचा विचार करता शिल्पावरील हे आरोप बिनबुडाचे आहेत. त्यामुळे तिची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेला अहवाल आणि सादर केलेल्या कागदपत्रांचा विचार करता शिल्पा शेट्टीवर लावण्यात आलेले आरोप हे निराधार आहेत. त्यांच्या या अहवालावर महानगर दंडाधिकारी हे समाधानी आहेत. त्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

शिल्पा शेट्टीने २००७ साली राजस्थानमध्ये एड्सबद्दल जनजागृती करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात भाग घेतला होता. या कार्यक्रमात तिने हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरेने किस केले होते. २००७ मध्ये घडलेल्या या घटनेनंतर तिच्याविरुद्ध अश्लीलतेच्या आरोपाखाली राजस्थानमध्ये दोन आणि गाझियाबादमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सरोगसीबद्दलच्या ‘त्या’ ट्वीटवर तस्लिमा नसरीन यांचं स्पष्टीकरण, म्हणाल्या “प्रियांका आणि निकचा काहीही…”

शिल्पा शेट्टीच्या या प्रकरणावर बराच वाद झाला होता. याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. या खटला मुंबईला हस्तांतरित करण्याच्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने २०१७ मध्ये परवानगी दिली होती. तर दुसरीकडे, शिल्पा शेट्टी यांनी अधिवक्ता मधुकर दळवी यांच्यामार्फत CPC च्या कलम २३९ आणि २४५ अंतर्गत डिस्चार्जसाठी अर्ज केला होता. दरम्यान या प्रकरणानंतर सर्वोच्च न्यायलयाने हा खटला रद्द केला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress shilpa shetty granted relief in obscenity case related to richard gere in 2007 nrp
First published on: 25-01-2022 at 18:01 IST