अभिनेत्री शिल्पा शिंदे कायमच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. यावेळी ती सुनील ग्रोवरच्या गॅग्स ऑफ फिल्मिस्तान या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आली आहे. शिल्पाने या शोमधून काढता पाय घेतला असून सुनील ग्रोवरवर काही आरोप केले आहेत. सुनील मला ज्युनिअर आर्टिस्टसारखी वागणूक देत होता असं वक्तव्य शिल्पाने केलं आहे. ‘पिंकव्हिला’नुसार, शोच्या चित्रीकरणावेळी सुनील ज्युनिअर आर्टिस्टप्रमाणे वागणूक देत होता. तसंच तो स्वत:शिवाय कोणालाच लाइमलाइटमध्ये येऊ देत नव्हता असं शिल्पाने म्हटलं आहे.

“ज्यावेळी मला निर्मात्यांनी फोन केला होता, त्यावेळी सुनील या कार्यक्रमाचा भाग नाही असं त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यामुळे मी या कार्यक्रमात सहभागी होण्याची निर्णय घेतला. परंतु, प्रत्यक्षात सुनीलदेखील या कार्यक्रमात आहे हे मला नंतर समजलं. म्हणजेच शो मेकर्स माझ्याशी खोटं बोलले होते. या शोदरम्यान ते मला कायम ज्युनिअर आर्टिस्ट असल्यासारखी वागणूक देत होते”, असं शिल्पा म्हणाली.

पुढे ती म्हणते, “यापूर्वी एका कार्यक्रमात आम्ही जिओसाठी काम केलं होतं. तेव्हा सुनीलने मला केवल शोभेची बाहुली म्हणून उभं केलं होतं. त्यावेळी मी त्यांची फॅन होते आणि रिलायन्सकडूनदेखील या शोसाठी चांगलं मानधन मिळालं होतं. त्यामुळे मी हे काम केलं. त्यानंतर गॅग्स ऑफ फिल्मिस्तानचा प्रोमो पाहूनदेखील मी नाराज झाले होते. या प्रोमोमध्येदेखील सुनीलचं लाइमलाइटमध्ये होते. पण सुनील एक सिनिअर अॅक्टर आहेत. त्यांनी ते स्थान मिळवलं आहे असं म्हणून मी दुर्लक्ष केलं. मात्र दुसऱ्या प्रोमोमध्येदेखील तेच पाहायला मिळालं. त्यामुळे या सगळ्या मी कंटाळे आणि त्यांनी केवळ प्रसिद्धीसाठी माझा वापर केलाय हे माझ्या लक्षात आलं”.

दरम्यान, शिल्पा शिंदे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘भाभीजी घर पर है’, बिग बॉस’ अशा अनेक कार्यक्रमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यामुळे आज तिचा असंख्य मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.