अभिनेत्री स्नेहलता वसईकर ही मराठी मालिकांमुळे घराघरांत पोहचली. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेमध्ये तिने साकारलेली ‘सोयरा बाईसाहेब’ ही भूमिका तर प्रचंड गाजली. त्यानंतर आता डॉ. अमोल कोल्हे यांच्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यात स्नेहलता महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारत आहे. आता महाराणीच्या वेशभूषेवरून ट्रोल करणाऱ्या एका नेटकऱ्याला स्नेहलताने सडेतोड उत्तर दिलं आहे.

स्नेहलताचा चाहतावर्ग मोठा आहे. तीदेखील सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत त्यांच्या संपर्कात असते. ती नेहमीच तिची मतं स्पष्टपणे मांडताना दिसते. आता ती ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ती साकारत असलेल्या या भूमिकेला भरभरून प्रेम मिळत आहे. अशातच एका नेटकऱ्याने तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
kolhapur, cracks on ambabai mahalaxmi idol
अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीवर तडे, तातडीने संवर्धन गरजेचे; पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात निष्कर्ष
latur lok sabha marathi news, shivraj patil chakurkar latur latest news in marathi
शिवराज पाटील यांच्या ‘देवघरा’ बाहेरील गर्दी वाढली
With the blessings of Udayanaraj i got more strength says shivendrasinh raje
सातारा: महाराजांच्या आर्शिवादाने मला दहा हत्तीचे बळ- शिवेंद्रसिंहराजे

आणखी वाचा : Video: प्राजक्ता गायकवाडने खरेदी केलं नवीन घर, सत्यनारायणाची पूजा व गृहप्रवेशाचा व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली…

स्नेहलता वसईकरने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती महाराणी येसूबाई या भूमिकेसाठी तयार होताना दिसत आहे. त्यावर कमेंट करत एका नेटकऱ्याने लिहिलं, “महाराणीचा पेहराव केल्यामुळे कोणी सुसंस्कृत होत नसतं. त्यासाठी महाराणी असावं लागतं. तुमच्या इतर चित्रफिती बघितल्या आहेत, त्यात तुम्ही कुठेच सुसंस्कृत दिसत नाहीत.” या कमेंटवर स्नेहलतानेही प्रतिक्रिया देत त्याला सडेतोड उत्तर दिलं. तिने लिहिलं, “माझ्यासाठी सुसंस्कृतपणा विचारांमधून आणि वर्तनातून व्यक्त होतो. तरीही तुम्ही कपड्यावरून जज करू शकता. माझी काहीच हरकत नाही (मी हे असले विचार दुर्लक्षितच करते). विचार मांडण्याचं व्यक्तिस्वातंत्र्य इथे प्रत्येकालाच आहे.”

हेही वाचा : “बिग बॉसचा प्रवास इथेच संपला असला तरी…” स्नेहलता वसईकरच्या पोस्टने वेधलं लक्ष

आता तिने ट्रोलरला दिलेलं हे उत्तर चांगलंच चर्चेत आलं आहे. तिच्या या उत्तरावर प्रतिक्रिया देत स्नेहलताच्या चाहत्यांनीही स्नेहलताची बाजू घेत कमेंट्स केल्या आहेत. याचबरोबर अनेकांनी स्नेहलताच्या कमेंटला लाईक देत तिला पाठिंबा दर्शवला आहे.