कुणाल खेमू आणि सोहा अली खान हे सेलिब्रिटी कपल सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. कुणाल-सोहाच्या लग्नाला काही वर्ष उलटून गेली असली तरी या दोघांमधील प्रेम काही कमी झालेलं नाही, दोघंही इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात. आता तर कुणालने सोहाबाबत एक मजेशीर व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

कुणालने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही. सोहा कुणालला मारते असं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. सोहा कुणालला मारताना दिसत असली तरी यामध्ये मजेशीर किस्सा दडलेला आहे. कुणाल-सोहाने हा मजेशीर व्हिडीओ तयार करण्यासाठी एका चित्रपटाच्या सीनची मदत घेतली आहे.

This fan’s reaction after seeing Shubman Gill at hotel is viral Relatable much
“दिल मे बजी घंटी…टंग टंग टंग!” शुभमन गिलला समोर पाहताच चाहतीच्या काळजाचा चुकला ठोका! Viral Video एकदा बघाच
child girls perform amazing dance on dhol tasha
ढोल ताशाच्या गजरात चिमुकल्या मुलींनी केला अप्रतिम डान्स, ऊर्जा पाहून तुम्हीही व्हाल फॅन
man riding on bull viral video
बापरे! भररस्त्यावर तरुण झाला रेड्यावर स्वार! व्हायरल Video पाहून तुम्हीही व्हाल हैराण…
people washing plates in fountain in wedding
Viral Video : लग्नात सजावटीसाठी लावला होता पाण्याचा कारंजा, पण लोकांनी जेवणाची ताटं धुतली, एकदा व्हिडीओ पाहाच


या व्हिडीओमध्ये कुणाल झोपलेला असताना अचानक त्याला जाग येते, डोळे उघडताच रागामध्ये असलेली सोहा त्याच्या डोळ्यासमोर उभी राहते. ते पाहून कुणाल लगेचच तिची माफी मागतो. हे सगळं घडत असताना कुणालच्या चित्रपटाचा सीन या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतो. कुणाल-सोहाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : ‘सून आलिया कशी आहे?’ नीतू कपूर यांनी दिलेलं उत्तर ऐकून म्हणाल सासू असावी तर अशी

कुणाल-सोहाच्या या व्हिडीओवर काही सेलिब्रिटी मंडळींनी देखील मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. कुणालने व्हिडीओ पोस्ट करताच काही तासांमध्ये त्याच्या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. कुणाल-सोहाला गोंडस मुलगी सुद्धा आहे. प्रत्येकाला हेवा वाटावं असंच बी-टाऊनमधील या कपलचं नातं आहे.