‘मॅडम तुमचं लग्न कधी होणार?’, चाहत्याच्या प्रश्नावर उत्तर देताना सोनाक्षी सिन्हा म्हणाली…

नुकतंच सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर ask me anything द्वारे चाहत्यांशी संपर्क साधला.

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनाक्षी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सोनाक्षी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियापासून दूर आहे. काही दिवसांपूर्वी सोनाक्षीचा ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यानंतर नुकतंच सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर ask me anything द्वारे चाहत्यांशी संपर्क साधला. यावेळी तिने चाहत्यांच्या सर्वच प्रश्नांना उत्तरे दिली.

गेल्या काही महिन्यात बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार विवाहबंधनात अडकत असल्याचे दिसत आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी सोनाक्षीलाही लग्नाबाबतचे प्रश्न विचारले आहेत. सोनाक्षीने नुकतंच इन्स्टाग्रामवर ask me anything द्वारे चाहत्यांशी संपर्क साधला. यावेळी एका चाहत्याने तिला प्रश्न विचारला की तुम्ही काय करत आहात? याचे उत्तर देताना सोनाक्षीने तिचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती मार्वल्सचा चित्रपट पाहताना दिसत आहेत.

वैवाहिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारताच संतापल्या नुसरत जहाँ, म्हणाल्या “माझे लग्न…”

यानतंर तिच्या स्टोरीवर उत्तर देताना सोनाक्षीचा आणखी एक चाहता म्हणाला की, ‘मॅडम सगळे लग्न करत आहेत. मग तुमचं लग्न कधी होणार?’ यावर सोनाक्षीने फारच गंमतीशीर पद्धतीने उत्तर दिले. ‘प्रत्येकाला कोव्हिडची लागण होत आहे, तसाच तो मलाही व्हायला हवाय का?’ असा प्रतिप्रश्न तिने त्या चाहत्याला केला आहे.

दरम्यान तिच्या यातील फोटोमुळे अनेकांना वाटले की सोनाक्षीला करोनाची लागण झाली आहे आणि सध्या ती त्यातून बरी होत आहे. यावर स्पष्टीकरण देताना सोनाक्षी म्हणाली की, कदाचित तुमच्या दोन प्रश्नांची गल्लत झाली आहे. यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. ‘मला कोव्हिड झालेला नाही. तसेच मी त्यावर उपचारही घेत नाही. मला फक्त घरी राहायला आवडते. त्याची एक वेगळी गंमत असते,’ असे तिने म्हटले.

सारा अली खान मेकअप करत असतानाच चेहऱ्याजवळ फुटला बल्ब; पाहा व्हिडीओ

सोनाक्षी सिन्हा ही लवकरच क्रिश जगरलामुडी दिग्दर्शित ‘शिवम’ या चित्रपटात झळकणार आहे. तिच्यासोबत या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेते महेश बाबू आणि पवन कल्याण हे देखील झळकणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress sonakshi sinha reacts as instagram fan asks when will she get married nrp

Next Story
अक्षय कुमारने मुंबईत खरेदी केला नवीन आलिशान फ्लॅट, किंमत ऐकून व्हाल थक्क!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी