बॉलिवूडमधील बिनधास्त आणि डॅशिंग अशी ओळख असलेली अभिनेत्री म्हणजे सोनाक्षी सिन्हा. यापूर्वी ती अजय देवगणच्या ‘भुज’ या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर ती कधी मोठ्या पडद्यावर दिसणार याची तिचे चाहते वाट बघत होते. बऱ्याच दिवसांपासून सोनाक्षी तिच्या आगामी ‘निकिता रॉय’ या चित्रपटासाठी चर्चेत आहे. आता अलीकडेच सोनाक्षीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

हेही वाचा : रजनीकांत यांनी निर्माण केली दहशत, ‘जेलर’ चित्रपटातील लूक आउट

सोनाक्षीने तिच्या आगामी ‘निकिता रॉय’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. यादरम्यानचा तिचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सोनाक्षी चित्रपटाच्या क्लॅप हातात घेऊन पोझ देताना दिसत आहे. सोनाक्षी सिन्हाने लंडनमध्ये तिच्या ‘निकिता रॉय अँड द बुक ऑफ डार्कनेस’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सोनाक्षी सिन्हाचा भाऊ कुश सिन्हा करत आहे. या चित्रपटाद्वारे कुश दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सोनाक्षी मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे.

आणखी वाचा : करीना कपूर, अर्जुन कपूर होत आहेत ट्रोल, तर शाहरुखचं होतंय कौतुक.. जाणून घ्या कारण

या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा व्यतिरिक्त अभिनेते परेश रावल आणि सुहेल नय्यर हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे शुटिंग लंडनमध्ये ४० दिवस चालणार आहे. निक्की भगनानी, विकी भगनानी आणि अंकुर टाकारानी, ​​कुश एस सिन्हा यांच्या क्रॅटोस एंटरटेनमेंट आणि निकिता पै फिल्म्सची किंजल घोने हिचे एनव्हीबी फिल्म्स मिळून ‘निकिता रॉय’ या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
यावर्षाच्या शेवटी किंवा पुढील वर्षी हा चित्रपट आपल्या भेटीला येईल.