scorecardresearch

“राखून ठेवलेले हे क्षण…” अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने शेअर केला लग्नाचा पहिला फोटो

सोनालीचे लग्न पारंपारिक पद्धतीने पार पडल्याचे दिसत आहे.

Sonalee Kulkarni Kunal Benodekar marriage photo
सोनाली कुलकर्णी-कुणाल बेनोडेकर

मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पुन्हा विवाहबंधनात अडकली. तिने तिचा पती कुणाल बेनोडेकर पुन्हा लगीनगाठ बांधली. लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी सोनाली-कुणाल पुन्हा एकदा थाटामाटात विवाहबंधनात अडकले. सोनाली ही सोशल मीडियावर फार सक्रीय असली तरी तिने तिच्या या लग्नाचे फोटो मात्र शेअर केले नव्हते. त्यामुळे तिचे चाहते हे फोटो पाहण्यासाठी फारच उत्सुक होते. अखेर सोनाली कुलकर्णीने तिच्या लग्नाचे खास फोटो शेअर केले आहेत.

सोनाली कुलकर्णी हिने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या लग्नाचे दोन फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोत कुणालने सोनालीचा हात हातात घेतल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या फोटोत सोनाली ही सप्तपदी चालताना दिसत आहे. या फोटोत सोनाली आणि कुणाल या दोघांचे चेहरे दिसत नाही. पण त्यांचे हे फोटो पाहून सोनालीचे लग्न पारंपारिक पद्धतीने पार पडल्याचे दिसत आहे.

“काय झालं, कसं झालं, सगळं लवकरच शेअर करु…”, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पुन्हा अडकली विवाहबंधनात

यावेळी सोनालीने छान हिरव्या रंगाची पैठणी परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे तिने हातावर आणि पायावर अगदी नववधूप्रमाणे छान मेहंदही काढली आहे. तर दुसरीकडे कुणालने छान धोती परिधान केली आहे. त्यांचा हा विवाहसोहळा अगदी मराठमोळ्या पारंपारिक पद्धतीने पार पडल्याचे या फोटोतून पाहायला मिळत आहे.

या फोटोला कॅप्शन देताना ती म्हणाली, “07.05.2022. ते. 11.08.2022…, राखून ठेवलेले हे क्षण, साठवून ठेवायला फक्त ६ दिवस बाकी”. यासोबतच तिने SonaleeKunalAWeddingStory on प्लॅनेट मराठी, 11august, SonaleeKunal, kenosona, sonaleekulkarni, kunalbenodekar असे विविध हॅशटॅगही शेअर केले आहेत. अवघ्या दोन तासांपूर्वी शेअर केलेल्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी लाइक्सचा आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. यावर अनेकांनी कमेंट करत तिला लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

“हीच ती वेळ…”, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत

दरम्यान सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांचा २ फेब्रुवारी २०२० रोजी दुबईत साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर ७ मे २०२१ रोजी ते दोघेही अत्यंत साध्या पद्धतीने विवाहबंधनात अडकले होते. यानंतर लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी त्या दोघांनी पुन्हा एकदा थाटामाटात विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तिने पती कुणाल बेनोडेकरसोबत पुन्हा लगीनगाठ बांधली.

यानंतर आता येत्या ११ ऑगस्टला प्लॅनेट मराठीवर सोनालीच्या लग्नाचा व्हिडीओ प्रदर्शित केला जाणार आहे. सोनाली-कुणालचा विवाहसोहळा नेमका कसा पार पडला? हे प्रेक्षकांना पाहता येणार आहे. त्यामुळे तिचे चाहते फार उत्सुक असल्याचे पाहायला मिळाले.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress sonalee kulkarni share marriage photo got married to kunal benodekar in london nrp

ताज्या बातम्या