‘रक्षाबंधनाच्या दिवशी भेटू शकलो नाही पण मला माहितीये मी जगातली.. ‘अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची पोस्ट व्हायरल

सोनाली कुलकर्णी आणि तिचा भाऊ संदेश कुलकर्णी हे दोघे मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत.

‘रक्षाबंधनाच्या दिवशी भेटू शकलो नाही पण मला माहितीये मी जगातली.. ‘अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची पोस्ट व्हायरल
रक्षाबंधन सोनाली कुलकर्णी संदेश कुलकर्णी

रक्षाबंधन हा सण नुकताच होऊन गेला, भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचा हा सण. आपल्याकडे हा सण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सामान्य माणसांप्रमाणे सेलिब्रेटी मंडळी देखील यात मागे नाही. सेलिब्रेटी मंडळींच्या रक्षाबंधनाचे फोटो आपण सोशल मीडियावर पाहिले. बॉलिवूडमध्ये अर्जुन कपूर- जान्हवी कपूर, सोनम कपूर -हर्षवर्धन कपूर, रणबीर -करीना कपूर या भाऊ बहिणींच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. मराठी सेलिब्रेटी भाऊबहीण यात मागे नाहीत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने देखील आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर करत रक्षाबंधनाची पोस्ट शेअर केली आहे.

आपल्या पोस्टमध्ये ती असं म्हणते लेट पोस्ट नव्हे लेट राखी..’मला माहितेय मी जगातली सगळ्यात भाग्यवान मुलगी आहे कारण मी माझ्या दोन्ही भावांची लाडकी बहीण आहे. आम्ही रक्षाबंधनाच्या दिवशी भेटू शकलो नाही पण संदीप दादा तुला राखी त्यादिवशी मिळाली. संदेशला मी त्याच्या नाटकाच्या प्रयोगाला जाऊन बॅकस्टेजला राखी बांधली’. अशा शब्दात तिने आपले भावांबद्दलचे प्रेम आणि भावना व्यक्त केल्या आहेत.

सोनालीने काहीच दिवसांपूर्वी दिल चाहता हैं या चित्रपटाला २१ वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्ताने चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देणारी पोस्ट इन्स्टाग्राम अकाऊंटनवरून शेअर केली होती. सोनाली या चित्रपटात सैफ अली खानच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसली होती. सोनाली मराठीच नव्हे तर इतर प्रादेशिक चित्रपटांमध्ये काम करत असते.

‘दिल चाहता है’ चित्रपटाला २१ वर्ष पूर्ण, मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल

सोनाली कुलकर्णी आणि तिचा भाऊ संदेश कुलकर्णी हे दोघे मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. संदेश कुलकर्णी आपल्याला कॉफी आणि बरंच काही, मसाला, रॉकी हँडसम यासारख्या चित्रपटात दिसला आहे. तसेच त्याने काही नाटकांमध्ये देखील काम केले आहे. त्याची पत्नी अमृता सुभाष ही सुद्धा गेली कित्येक वर्ष अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress sonali kulkarnis shared emotional post on rakshabandhan ceremony spg

Next Story
जॉन अब्राहम दिसणार नव्या भूमिकेत, केली आगामी चित्रपटाची घोषणा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी