अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनने (Rajeev Sen) २०१९मध्ये अभिनेत्री चारु असोपा (Charu Asopa) हिच्याशी लग्न केलं. अगदी थाटामाटात या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. आता राजीव-चारु लवकरच विभक्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोघांनी हा निर्णय का घेतला? हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. पण दोघं लवकरच घटस्फोट घेणार असल्याचं बोललं जात आहे.




‘ये रिश्ता क्या कहलता है’, ‘मेरे अंगने में’ या हिंदी मालिकांमुळे चारु नावारुपाला आली. तिने राजीवशी लग्न करत आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. पण आता दोघांमध्ये सतत वाद होत असल्याचं समोर आलं आहे. ई टाइम्सच्या वृत्तानुसार, चारु आणि राजीवमध्ये सध्या वाद सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये मतभेद होत आहेत. शिवाय वाद बाजूला करत आपलं नातं टिकवण्याचा चारु-राजीवने प्रयत्न केला.
पण प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही. इतकंच नव्हे तर दोन्ही कुटुंबियांनी चारु-राजीवमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या प्रयत्नांना देखील अपयश आलं. दोघांनी बहुदा कायदेशीररित्या घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. सेन कुटुंबियांना देखील त्यांचा हा निर्णय ऐकून धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे.
चारु-राजीवला सात महिन्यांची झियाना नावाची गोंडस मुलगी देखील आहे. मुलीच्या जन्मानंतर देखील या दोघांमध्ये वाद हे सुरुच राहिले. इन्स्टाग्रमावर चारु आपल्या पतीला फॉलो देखील करत नाही. इतकंच नव्हे तर तिने राजीवबरोबरचे फोटो देखील इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन डिलीट केले आहेत. याबाबत सध्यातरी राजीव-चारुने मौन पाळणंच पसंत केलं आहे.