बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही कायमच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून बिनधास्तपणे सामाजिक विषयांवर तिचे मत मांडताना दिसते. अनेकदा तिला या गोष्टीमुळे सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात येते. पण स्वरा देखील शांत बसत नाही. आता स्वरा भास्कर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतंच तिने ‘काली’ या माहितीपटाच्या पोस्टरवादावर भाष्य केले आहे. स्वरा भास्करने ट्वीट करत अनेकांना सल्ला दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय चित्रपट निर्मात्या आणि दिग्दर्शक लिना मणीमेकल यांच्या ‘काली’ या माहितीपटावर जोरदार टीका होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी या माहितीपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. पण या माहितीपटाच्या पोस्टरमधून कालीमातेचा अपमान करण्यात आला दावा अनेकजण करत आहे. ‘काली’ या माहितीपटाच्या पोस्टरवर हिंदू देवतेच्या अवतारात एक महिला दिसत आहे. मात्र ही महिला सिगारेट ओढताना दिसत आहे. या पोस्टरवरील या महिलेच्या मागील बाजूस समलैंगिकतेसंदर्भातील सप्तरंगी झेंडाही दिसत आहे. यावरून अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत टीका केली जात आहे.

Kaali Poster Row : वादग्रस्त पोस्टरमुळे निर्माते अडचणीत, दिल्ली- युपीमध्ये FIR दाखल

याप्रकरणी मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये बुधवारी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनीही प्रतिक्रिया देत देवी कालीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संपूर्ण प्रकरणी आता स्वरा भास्करने ट्वीट करत महुआ मोईत्राला समर्थन दिले आहे. तिने बुधवारी याप्रकरणी दोन ट्वीट केले आहे. यातील एका ट्वीटमध्ये ती म्हणाली, “महुआ तुम्ही खरच खूप जबरदस्त आहात. तुमचा आवाज त्याहूनही जबरदस्त आहे.”

त्यानंतर पुढे ती म्हणाली, ‘प्रिय हिंदू, उजव्या विचारसरणीचे आणि इतर घाबरलेल्या विचारांचे लोक जर तुम्हाला हिंदू धर्माची विविधता समजत नसेल. तुम्ही त्यातील भिन्न प्रथा आणि परंपरा स्वीकारत नसाल तर तो धर्माचा अपमान नाही का? असा प्रश्नही तिने विचारला आहे.

Kaali Poster Row : कालीमातेच्या पोस्टर प्रकरणात शिवसेनेची उडी; प्रवक्त्या म्हणाल्या, “अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे केवळ हिंदू…”

दरम्यान, महुआ मोईत्रा यांनी काली या माहितीपटाच्या पोस्टरवर प्रतिक्रिया देताना, “माझ्यासाठी कालीमाता मांसाहार आणि मद्याचा स्वीकार करणारी आहे. तुमच्या ईश्वराविषयी कल्पना करण्याची तुम्हाला स्वातंत्र्य आहे. काही ठिकाणी ईश्वराला व्हिस्की नैवेद्य म्हणून दिली जाते, तर काही ठिकाणी ही ईश्वरनिंदा ठरते”, असे वक्तव्य केले होते. यावरूनच त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress swara bhasker supports tmc mp mahua moitra over her comments on kaali poster controversy nrp
First published on: 07-07-2022 at 10:58 IST