नववीत प्रेम, काही महिन्यातच ब्रेकअप, तापसीने सांगितला पहिल्या प्रेमाचा किस्सा

प्रोफेशनल लाईफप्रमाणे तापसीच्या खासगी आयुष्याचीही प्रचंड चर्चा होते.

तापसी पन्नू ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तापसी ही वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत असते. तापसी पन्नू लवकरच ‘रश्मी रॉकेट’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. तापसीने अनेक दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. सूरमा, मुल्क आणि मनमर्जिया यासारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात तापसी झळकली आहे. प्रोफेशनल लाईफप्रमाणे तापसीच्या खासगी आयुष्याचीही प्रचंड चर्चा होते. तापसी नववीत असताना एका मुलाच्या प्रेमात पडली होती, याचा खुलासा तिने स्वत:च एका मुलाखतीत केला होता.

तापसी पन्नूने काही दिवसांपूर्वी एका प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक आठवणी शेअर केल्या होत्या. यावेळी तिन तिच्या पहिल्या प्रेमाबद्दलचा एक किस्सा सांगितला होता. “मी नववीला असताना मला एका मुलगा फार आवडायचा. त्यावेळी तो दहावीला होता. माझे त्याच्यावर प्रचंड प्रेम होते. मात्र त्यादरम्यान त्याची दहावीची बोर्डाची परीक्षा सुरु झाली. त्यामुळे त्याने माझ्यासोबत ब्रेकअप केला. ब्रेकअप झाल्यानंतर मी फार रडली,” असा खुलासा तापसीने या मुलाखतीदरम्यान केला.

यापुढे तापसी म्हणाली, “मला आजही आठवते की त्यावेळी माझ्याकडे मोबाईल नव्हता. त्यामुळे मी त्याच्याशी बोलण्यासाठी पीसीओ बूथचा वापर करायची. त्या पीसीओचा वापर करुन मी त्याला फोन करायची. विशेष म्हणजे तापसीने तिच्या बॉयफ्रेंडला ब्रेकअप का केला? याचे कारणही विचारले होते. मात्र त्याने काहीही उत्तर दिले नाही,” असेही तिने सांगितले.

यानतंर “आता मी ज्या कोणासोबत रिलेशनशिपमध्ये येईन, त्यावेळी मी त्या व्यक्तीला समजून घेईन आणि त्याचा आदर करणे याला प्राथमिकता देईन. त्यासोबतच जोडीदार असा असावा की त्याने मला चांगल्या पद्धतीने समजून घ्यावे,” असे तापसी म्हणाली.

हेही वाचा : पुरुषासारखे शरीर आहे म्हणणाऱ्याला तापसीचे सडेतोड उत्तर..

तापसीचा ‘रश्मी रॉकेट’ हा चित्रपट १५ ऑक्टोबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आकर्ष खुराना यांनी केले आहे. हा चित्रपट नंदा पेरियासामी यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. या चित्रपटात तापसी व्यतिरिक्त सुप्रिया पाठक, अभिषेक बॅनर्जी, प्रियांशु पेन्युली आणि सुप्रिया पिळगावकर दिसणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Actress taapsee pannu first love story during school time but it broke up nrp

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या