दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजयच्या ‘लिओ’ चित्रपटाने जोरदार कमाई केली. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले. प्रेक्षकही या चित्रपटाचं जोरदार कौतुक करत आहेत. या चित्रपटात अभिनेत्री त्रिशा कृष्णनने काम केलं होतं. यातील तिचा सहकलाकार मन्सूर अली खानने त्रिशाबद्दल केलेल्या एका वक्तव्याने वातावरण तापलं आहे. संतापलेल्या अभिनेत्रीने त्याच्याबरोबर कधीच काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.

मन्सूर अली खानने त्रिशाबद्दल काय म्हटलं?

“जेव्हा मी त्रिशाबरोबर काम करतोय, असं ऐकलं तेव्हा मला वाटलं की चित्रपटात बेडरूमचा सीन असेल. मला वाटलं मी तिला बेडरूममध्ये घेऊन जाईन. जसे मी माझ्या आधीच्या चित्रपटात इतर हिरोईनबरोबर केले होते. मी अनेक चित्रपटांमध्ये रेप सीन केले आहेत. हे माझ्यासाठी नवीन नाही. पण या लोकांनी मला काश्मीर शेड्यूलमध्ये त्रिशाला पाहूही दिले नाही,” असं वक्तव्य पत्रकार परिषदेत मन्सूर अली खानने केलं होतं.

Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
anushka pimputkar and meghan jadhav started new business
‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री झाली बिझनेसवुमन! ‘या’ अभिनेत्याच्या साथीने सुरू केला हटके व्यवसाय; पाहा झलक
Ajit Pawar Bhor Assembly Constituency
Ajit Pawar: ‘नायतर आम्हाला कुत्रं विचारणार नाही’, भरसभेतच अजित पवार भडकले, पोलिसांवर व्यक्त केला संताप
Lakhat Ek Aamcha dada
Video: तेजूच्या लग्नाची सुपारी फुटली; डॅडी म्हणाले, “खरे नवरदेव…”, पाहा प्रोमो
Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO

त्रिशाने व्यक्त केला संताप

“नुकताच एक व्हिडीओ माझ्या निदर्शनास आला आहे, ज्यामध्ये मन्सूर अली खान माझ्याबद्दल अतिशय अश्लील आणि घृणास्पद बोलले आहेत. मी याचा तीव्र निषेध करते. ती टिप्पणी लिंगभेद करणारी, अपमानास्पद, घृणास्पद आणि वाईट होती. त्यांनी त्यांची इच्छा बाळगावी, पण मी त्यांच्यासारख्या व्यक्तीबरोबर स्क्रीन स्पेस कधीही शेअर केली नाही याचा मला आनंद आहे. माझ्या नंतरच्या फिल्मी करिअरमध्येही कधीच काम करणार नाही याची मी काळजी घेईन. त्यांच्यासारखे लोक मानवजातीचे नाव बदनाम करतात,” असं त्रिशाने एक्सवर पोस्ट करत म्हटलं.

दरम्यान, त्रिशाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिचं समर्थन केलं आहे. मन्सूर अली खानने यापूर्वीही तमन्ना भाटियाबद्दलही आक्षेपार्ह विधान केलं होतं, अशी कमेंट त्रिशाच्या पोस्टवर एका युजरने केली आहे. मन्सूर अली खान हा एक घृणास्पद आणि गैरवर्तन करणारा आहे.