‘बिग बॉस ओटीटी’ हा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय शो आहे. या शोमधून पहिल्याच आठवड्यात उर्फी जावेद बाहेर पडली. मात्र त्यानंतर तिच्या बोल्ड अंदाजामुळे ती चर्चेत आली होती. उर्फीने तिच्या बोल्ड अंदाजासोबतच तिच्या हटके स्टाइलने अनेकदा नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. कधी ब्रॉलेटमुळे तर कधी पॅन्टचं बटन न लावल्याने उर्फी जावेद चर्चेत आली होती. तिच्या या हटके फॅशनमुळे तिला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल देखील केलं होतं. मात्र आता उर्फीने तिच्या बॉयफ्रेंडची पहिली झलक दाखवली आहे. नुकतंच तिने त्याच्यासोबतचा एक नवा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात तिचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उर्फी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती सोशल मीडियावर अनेकदा तिचे बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करताना पाहायला मिळते. मात्र तिच्या कपड्यांच्या हटके स्टाईलमुळे तिला अनेकदा ट्रोल केले जाते. काही दिवसांपूर्वी उर्फीने बॅकलेस पण विचित्र असा टॉप परिधान केला होता. त्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. दरम्यान यानंतर आता उर्फीने तिच्या बॉयफ्रेंडची झलक दाखवणारा एक व्हिडीओ इनस्टाग्रामवर शेअर केला आहे.

“पालक आपल्या मुलीला या अवतारात पाहू शकत नाही”; उर्फीचा ‘विचित्र’ लूक पाहून नेटकरी भडकले

या व्हिडीओत ती प्रचंड रोमँटिक अंदाजात पाहायला मिळत आहे. “मी तुझ्या प्रेमात आहे, मित्रांनो माझ्या बॉयफ्रेंडला भेटा”, असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे. तिच्या या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

दरम्यान उर्फीने दोन दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ आणि काही फोटो पोस्ट केले होते. यात तिने बॅकलेस पण विचित्र टॉप परिधान केला होता. त्यासोबत पांढऱ्या रंगाची पँट परिधान केली होती. उर्फीचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. तिचा हा हटके लूक पाहून नेटकरी चांगलेच संतापले होते. अनेकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. हा फोटो शेअर करतेवेळी तिने कोंबडी आधी की अंड? असा प्रश्न विचारला होता. तिचा हा प्रश्न पाहून नेटकऱ्यांनी त्यावर भन्नाट उत्तर दिली होती. “या प्रश्नाचे उत्तर नासाला माहिती असेल”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली होती.

उर्फीचा हा लूक पाहून “काहींनी कशाला घातलंस?” असा सवाल केला होता. तर एका नेटकऱ्याने “डेटॉलने कंबर साफ कर, डाग दिसतायत?” अशी कमेंट केली होती. “तू यापेक्षा चांगलं काही तरी घालू शकली असतीस?” असेही एक नेटकरी तिला म्हणाला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress urfi javed shares video with boyfriend on instagram nrp
First published on: 25-10-2021 at 17:28 IST