Video : मराठमोळी अभिनेत्री उर्मिला निंबाळकरच्या डोहाळे जेवणाची चर्चा

उर्मिलाने तिच्या युट्यूब लॉगमधून हा व्हिडीओ शेअर केला आहे.

urmila nibalkar, urmila nibalkar dohale jevan video,
उर्मिलाने तिच्या युट्यूब लॉगमधून हा व्हिडीओ शेअर केला आहे.

अभिनेत्री आणि युट्यूब असलेली ऊर्मिला निंबाळकर सगळ्यानांच माहिती आहे. ऊर्मिलानं हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. दिया और बाती ही तिची मालिका चांगलीच गाजली. त्याचबरोबर तिने काही मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. सध्या उर्मिला तिच्या आयुष्यातील खास क्षण अनुभवत आहे. उर्मिला गर्भवती असून लवकरच तिच्या बाळाला जन्म देणार आहे. उर्मिलाचा नुकताच डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झाला. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

उर्मिलाने हा व्हिडीओ तिच्या युट्यूब लॉगमधून शेअर केला आहे. गर्भवती असताना तिच्या काय भावना होत्या आणि आता ९ महिने झाल्यानंतर तिला कसं वाटतंय हे तिने यात सांगितले आहे. एवढंच नाही तर डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाच्या तयारी पासून तो कार्यक्रम संपण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टीने तिने यात सांगितल्या आहेत. प्रत्येक स्त्रीसाठी एक आई होणं हे खूप खास असतं. गर्भवती असतानाचा तो काळ त्या स्त्रीपासून तिच्या संपूर्ण कुटूंबासाठी आनंदाचा असतो.

आणखी वाचा : अभिनेत्री गहनाचं इन्स्टाग्रामवर न्यूड लाईव्ह; लोकांना म्हणाली, हे पॉर्न आहे का?

उर्मिलाने तिच्या कुटुंबासोबत करोनाचे सगळ्या निर्बंधांचे पालन करत डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला आहे. पुण्यातील ‘ढेपे वाडा’ या ठिकाणी हा कार्यक्रम करण्यात आला आहे. व्हिडीओत उर्मिलाचा संपूर्ण दिवस दाखवण्यात आला आहे. उर्मिलाने गर्भारपणातील स्त्री विषयी सांगताना एक पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत “एका गर्भारपणातील स्रीची प्रतिमा, कमकुवत, परावलंबी, लाचार अशी का झालीय माहित नाही. मागच्या ९ महिन्यातील, तुम्ही दिलेल्या भरभरुन प्रतिसादावरुन, तुमच्या कमेंटस् मधून मी हा विचार बदलायला मदत करतीय, असं माझ्या लक्षात आलं. पण खरं सांगायचं तर, मी हे सगळं अजिबातच ठरवून नाही केलं, असे उर्मिला म्हणाली आहे.

आणखी वाचा : ‘एक आई म्हणून विनंती करतेय…’; राज कुंद्रा प्रकरणी शिल्पा शेट्टीनं मांडली भूमिका

पुढे तिच्या प्रवासा विषयी बोलताना उर्मिला म्हणाली, “माझ्या पहिल्या गर्भवती असण्याच्या घोषणे पासून ते, ९ महिने भरपूर काम करेपर्यंत आणि आता चक्क हॅास्पिटलची बॅग भरेपर्यंत मला मी कधीच थकलेली, बिचारी वाटले नाही. उलट मी या दिव्य परमेश्वरी व्यवस्थेच्या, माझ्या शरीराच्या, घरच्यांच्या, वेगवेगळ्या बदलांच्या प्रेमात पडत गेले.माझा डोहाळजेवणाचा लूक ठरवतानाही मला फक्त सुंदर, दिसायचं नव्हतं तर एखाद्या शूर पराक्रमी स्त्री सारखं राजेशाही थाटात मिरवायचं होतं. शरीरातील वेगवेगळ्या हार्मोन्स च्या मदतीनं, अधिराज्य गाजवणारी राणी!”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Actress urmila nibalkar dohale jevan video went viral dcp

ताज्या बातम्या