scorecardresearch

विमानतळावर जाताना उर्वशीच्या ड्रेसचे स्लीव्ह्स घसरले अन्….व्हिडीओ व्हायरल

उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्या दोघांमध्ये नेहमीच विविध कारणांमुळे चर्चा सुरु असते

विमानतळावर जाताना उर्वशीच्या ड्रेसचे स्लीव्ह्स घसरले अन्….व्हिडीओ व्हायरल
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

अभिनेत्री उर्वशी रौतेला ही बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. ती तिचे बोल्ड फोटो सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करत असते. भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या अपघातावर तिने पोस्ट शेअर केली आणि ती चर्चेत आली. उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्या दोघांमध्ये नेहमीच विविध कारणांमुळे चर्चा सुरु असते. त्यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे नुकतीच ती विमानतळावर दिसली होती. तिच्या ड्रेसवरून तिला ट्रोल करत आहेत.

उर्वशीने अप्रत्यक्ष पोस्ट शेअर करत ऋषभ पंतच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. अशातच ती विमानतळावर दिसली जिथे तिने काळ्या रंगाचा सिव्हलेस ड्रेस परिधान केला होता. यावेळी तिच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. ती विमानतळाकडे जात असताना तिच्या ड्रेसचे स्लीव्ह्स घसरले तिने लगेचच ते सावरले, मात्र तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी कमेंट करण्यास सुरवात केली.

सुजलेला चेहरा अन् डोळ्याखाली जखम; उर्फी जावेदला नेमकं काय झालंय?

हा व्हिडीओ व्हायरल होताच एकाने लिहले आहे, “तिच्या स्लीव्ह्सकडे लक्ष देऊ नका ती खूप छान दिसत आहे.” तर दुसऱ्याने लिहले की “तिने परिधान केलेला ड्रेस उत्तम आहे.” आणखीन एकाने लिहले आहे “ती दिसायला खूप सुंदर आहे मात्र तिचा ड्रेस खूप मजेशीर आहे.” आणखीन एकाने लिहले आहे की “असा ड्रेस परिधान करून मी डिस्को पार्टीमध्ये जातेस का?” अशा शब्दात नेटकऱ्यांनी कमेंट्स करण्यास सुरवात केली आहे.

उर्वशी मूळची हरिद्वारची आहे, तिने आपल्या करियरची सुरवात मॉडेलिंग क्षेत्रापासून केली आहे. ‘सिंग साब द ग्रेट’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तसेच ती काही म्युझिक अल्बममध्ये झळकली आहे. तिने दाक्षिणात्य चित्रपटातदेखील काम केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-01-2023 at 11:10 IST

संबंधित बातम्या