‘बुलाता है मगर जाने का नही’, म्हणत अदाने शेअर केला मजेशीर व्हिडीओ

हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू येईल

देशात करोनाचा प्रदुर्भाव वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल २४ मार्च रोजी सर्वात मोठी घोषणा केली. त्यांनी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केले आहे. हा लॉकडाउन २१ दिवसांसाठी असणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील नागरिक हे घरात बसल्याचे पाहायला मिळत आहेत. याला बॉलिवूड कलाकार देखील अपवाद नाहीत. पण हे बॉलिवूड कलाकार सध्या घरात बसून अनेक कामे करताना दिसत आहेत. नुकताच अभिनेत्री अदा शर्माने एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे.

अदाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती एक्ससाइज करता-करता घरातील साफ सफाई करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘तुम्ही ज्या मित्रांना अशा रुपात पाहू इच्छिता. त्या सर्वांना हा व्हिडीओ टॅग करा. अनेकांना वेळे आभावी एक्ससाइज करायला मिळत नाही. तुमच्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे. जर एक्ससाइज करताना फोन वाजत असेल तर फोन बुलाता है मगर जाने का नही. तसेच सध्या घरात सुरक्षित रहा’ असे कॅप्शन दिले आहे.

यापूर्वी क्वारंटाइनमध्ये अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा भांडी धुतानाचा आणि सिद्धार्थ मल्होत्राचा जेवण बनवत असतानाचा व्हिडीओ समोर आला होता. तर सैफ अली खान आणि तैमूर झाडे लावताना दिसला. तर दुसरी कडे दिपीका पियानोचे धडे घेताना दिसत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Adaa khan funny video viral on social media avb

ताज्या बातम्या