‘अमराठी अभिनेत्रीचा डंका पिटण्यासाठी मराठी अभिनेत्रींच्या…’, बांदेकरांनी केला वाघ यांच्या ट्विटचा निषेध

त्याचे हे ट्विट सध्या चर्चेत आहे.

भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी मराठी कलाकारांची खिल्ली उडवत केलेल्या ट्विटमुळे ते सध्या चर्चेत आहेत. तसेच त्यांच्या या ट्विटचा अनेक मराठी कलाकारांनी निषेध केला. आता अभिनेते आदेश बांदेकर यांनी देखील वाघ यांच्या ट्विटचा निषेध केला आहे.

आदेश बांदेकर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये अवधूत वाघ यांना टॅग करत ‘मराठी अभिनेत्रीनी स्वकष्टातून घेतलेली स्कुटी आणि फर्स्ट क्लासचा पास हा आत्मसन्मान आहे. मानधन आणि आर्थिक परिस्थिती वरून केलेली थट्टा ही अत्यंत निंदनीय आहे. कुणा अमराठी अभिनेत्रीचा डंका पिटण्यासाठी मराठी अभिनेत्रींच्या आत्मसन्मानाचा अपमान अत्यंत दुर्दैवी, तीव्र निषेध’ असे म्हटले आहे.

यापूर्वी अभिनेता हेमंत ढोमेने ट्विट करत त्याचे मत मांडले होते. हेमंतने ट्विटमध्ये ‘जे कष्ट करतात… छोट्या गावातुन येऊन मोठी स्वप्नं बघतात… स्वत:ला सिद्ध करतात… अशा लोकांना आपण काहीही बोलण्याची आपली पात्रता आहे का? बरं ते जाऊद्या, मला माहित नाही पण ते सतरंज्या उचलणारे कोण असतात? ही नेमकी काय भानगड आहे?’ असे म्हणत अप्रत्यक्षपणे अवधूत वाघ यांना प्रश्न विचारला होता.

काय होते अवधूत वाघ यांचे ट्विट?

एका यूजरने ट्विटरवर कंगनाचे मानधन आणि मराठी अभिनेत्रींचे मानधन अधोरेखीत केले होते. या ट्विटमध्ये इथे कोणालाही कमी लेखण्याचा प्रयत्न नाहीये. पण आज ज्या पद्धतीने मराठी नट्या कंगनावर तुटून पडल्यात आणि तिला तिची लायकी सांगतायत… सर्वांच्या माहितीसाठी.. कंगनाची फी-११ कोटी (मुव्हीसाठी)\ १.५ कोटी (अॅडसाठी), मराठी नट्या- २.५ ते ५ लाख (मुव्हीसाठी)\ ७.५ ते १०,००० रुपये पर डे सीरियलसाठी असे ट्विटमध्ये म्हटले होते. या ट्विटला उत्तर देत अवधूत वाघ यांनी ट्विट केले. त्यांनी ट्विटमध्ये “स्कूटी घेतली की सेल्फी काढतात आणि डोंबिवली चर्चगेटचा फर्स्ट क्लासचा पास स्टेटस ठेवतात” असे म्हणत मराठी कलाकारांची खिल्ली उडवली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Adesh bandekar tweeted on bjp spoke person avdhut wagh comment on marathi actress avb

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या