scorecardresearch

“मी राखीशी लग्न केले नाही असं…” आदिल खानचा पोस्ट शेअर करत मोठा खुलासा

अखेर आता आदिलने एक पोस्ट शेअर करत याबद्दल खुलासा केला आहे.

“मी राखीशी लग्न केले नाही असं…” आदिल खानचा पोस्ट शेअर करत मोठा खुलासा

ड्रामा क्वीन अशी ओळख असलेली राखी सावंत ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. राखी सावंत ही दुसऱ्यांदा विवाहबद्ध झाली आहे. राखी सावंतने तिचा बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीबरोबर निकाह केल्याचे बोललं जात आहे. राखी सावंत आणि आदिल दुर्रानीचा सात महिन्यांपूर्वी निकाह झाला. तिने तिच्या लग्नाचे फोटोही शेअर केले होते. त्यानंतर आता आदिलने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

राखी सावंतने आदिल दुर्रानीबरोबर लग्न केल्याची घोषणा आठवडाभरापूर्वी केली होती. तिने तिच्या लग्नाचे काही फोटोही शेअर केले होते. मात्र त्यानंतर आदिलने राखीबरोबरच्या लग्नाला दुजोरा देण्यास टाळाटाळ केली होती. अखेर आता आदिलने एक पोस्ट शेअर करत याबद्दल खुलासा केला आहे. त्यात त्याने राखीबरोबर लग्न केल्याची कबुलीही दिली आहे.

“अखेर आता मी एक मोठी घोषणा करत आहे, मी राखीशी लग्न केले नाही असे कधीच म्हटलं नव्हतं. पण मला काही गोष्टी हाताळायच्या होत्या म्हणून मी शांत होतो. पण राखी आपल्या सुखी वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. (पप्पुडी)”, असे आदिलने या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

आदिलने त्याच्या इन्स्टाग्रामवर त्यांच्या लग्नाचा एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोत ते दोघेही गळ्यात वरमाला घालून उभे असल्याचे दिसत आहे. यावेळी राखी अगदी नववधूप्रमाणे नटल्याचे दिसत आहे.

दरम्यान राखी सावंतचे हे दुसरे लग्न आहे. तिने बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीबरोबर निकाह केला आहे. राखी सावंत आणि आदिल दुर्रानीचा सात महिन्यांपूर्वी निकाह झाला आहे. त्या दोघांचा निकाह २९ मे २०२२ ला झाला असून त्यांनी २ जुलै २०२२ ला लग्नाचे रजिस्ट्रेशन केले होते. त्यापूर्वी २०१९ मध्ये राखीने एनआरआय असणाऱ्या रितेशबरोबर लग्न केलं होतं. ते दोघे बिग बॉसच्या रिअ‍ॅलिटी शो मध्येही दिसले होते. पण २०२२ मध्ये त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्याचवर्षी राखी आणि आदिलने डेट करण्यास सुरुवात केली.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-01-2023 at 12:42 IST

संबंधित बातम्या