City Of Dream: ‘महेश’ साकारायला मिळणं हा सुंदर योगायोग- आदिनाथ कोठारे

‘सिटी ऑफ ड्रीम्स २’च्या निमित्ताने आदिनाथने लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली.

adinath kothare, city of dream, city of dream 3, priya bapat,
"महेश आरवले"ची भूमिका आदिनाथने साकारली आहे.

‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा पहिला सिझन प्रचंड गाजला होता. प्रेक्षकांच्या आग्रहाखातर त्याचा दुसरा सिझन आला. तोही आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सध्या एका व्यक्तिरेखेची जोरदार चर्चा आहे ती म्हणजे महेश आरवलेची. ही व्यक्तिरेखा आदिनाथ कोठारे याने साकारली असून त्याच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक होत आहे. ‘सिटी ऑफ ड्रीम्स २’च्या निमित्ताने आदिनाथने लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये त्याने ‘महेश साकारायला मिळणं हा सुंदर योगायोग’ असे म्हटले आहे. तसेच त्याने ‘८३’ चित्रपटात अभिनेता रणवीर सिंगसोबत काम करतानाचा अनुभव देखील सांगितला आहे.

आदिनाथ आपल्याला ‘८३’, ‘पाणी’, ‘पंचक’ यांसारख्या आगामी चित्रपटांमधून दिसणार आहे. ‘८३’ हा १९८३ च्या वर्ल्डकपवर आधारित चित्रपट आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंग, दिपीका पदुकोण यांचासोबत आदिनाथही झळकणार आहे. माधुरी दीक्षित निर्मिती ‘पंचक’ या चित्रपटातही आदिनाथ कोठारे दिसणार असून माधुरी सोबतचा त्याचा हा दुसरा चित्रपट आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Adinath kothare talk about to be part of city of dream 2 avb

ताज्या बातम्या