मराठमोळा दिग्दर्शक सध्या चर्चेत आहे कारण त्यांचा बिगबजेट चित्रपट ‘आदिपुरुष ‘लवकरच प्रेक्षकांच्या भेटली येणार आहे. याच चित्रपटाविषयी एक खास माहिती समोर आली आहे. सध्या अशी चर्चा आहे की येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात या चित्रपटाचा एक टिझर प्रदर्शित होऊ शकतो. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार आहे तर क्रिती सॅनॉन, सैफ अली खान हे कलाकारदेखील दिसणार आहेत. या चित्रपटातील जोडी म्हणजे प्रभास आणि क्रिती एकमेकांना डेट करत असल्याची बातमी इंडिया टीव्हीच्या सूत्रांकडून समजली आहे.

प्रभासने ‘बाहुबली’ चित्रपटातून आपल्या अभिनयनाने महिला चाहत्यांचे मन जिंकले होते. मिमीसारख्या वेगळ्या धाटणीचा चित्रपटातून क्रितीने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. सध्या हे दोघे आदिपुरुष या चित्रपटावर काम करत होते. चित्रपटाचे चित्रीकरण जरी संपले असले तरी दोघे अजूनही एकमेकांच्या संपर्कात आहेत. कॉल मेसेजच्या माध्यमातून ते एकमेकांशी संपर्क ठेवण्यात कधीच मागे पडत नाहीत. दोघांना एकमेकांबद्दल प्रशंसा आहे म्हणून त्यांच्या नात्याबद्दल उलगडा करणे हे खूपच घाई केल्यासारखे आहे. सहकलाकार त्यांच्या चित्रपटांचे चित्रीकरण करत असताना किंवा त्यांचे एकत्र प्रमोशन करताना एकमेकांशी जोडले जाणे सामान्य आहे, परंतु क्रिती आणि प्रभास वेगळे आहेत. त्यांच्यात एकमेकांबद्दल खरोखरच तीव्र भावना आहे. याबद्द्ल घाई होऊ नये असे त्यांना वाटते.

कोणताही कलाकार मालिका सोडतो तेव्हा मला.. ” तारक मेहताचे निर्माते भावूक

सूत्रांच्या माहितीनुसार चित्रपटाच्या सेटवरदेखील त्यांना एकमेकांसोबत वेळ घालवण्यास आवडायचा. हा चित्रपट रामायण या महाकाव्यावर बेतलेला आहे असं या चित्रपटाच्या निर्मात्यांचं म्हणणं आहे. पूर्णपणे रामायण यात नसलं तरी त्यासदृश्य कथा आपल्याला यामध्ये बघायला मिळेल. या चित्रपटात क्रिती सनॉन ही जानकी भूमिकेतदिसणार आहे तर प्रभास प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. याबरोबरच सैफ अली खान हा पुन्हा लंकेश या आगळ्या वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

दिग्दर्शक ओम राऊत याचा हा दुसरा चित्रपट. आधी त्याने अजय देवगण बरोबर ‘तान्हाजी’ हा चित्रपट बनवला होता. तान्हाजीमध्ये अजय देवगण, सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसले होते. ओम राऊत आणि त्याच्या टीमने ‘आदिपुरुष’ या चित्रपटावर मेहनत घेतली आहे. करोना काळात मध्यंतरी या चित्रपटाचं काम चांगलंच रखडलं होतं. आता मात्र हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार असून १२ जानेवारी २०२३ या दिवशी तो चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.