‘बाहुबली’ चित्रपटामुळे प्रभासला प्रचंड लोकप्रियता मिळाली. बाहुबलीनंतर त्याचे ‘साहो’, ‘राधेश्याम’ असे चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटांना प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. बाहुबलीनंतर प्रभास एका नव्या अवतारामध्ये दिसणार आहे. त्याचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ‘रामायण’ या महाकाव्यावर आधारित असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चित्रपटामध्ये प्रभू श्रीराम यांची भूमिका प्रभास साकारली आहे. त्याच्या व्यतिरिक्त क्रिती सेनॉन ही जानकीच्या आणि सैफ अली खान लंकेशच्या भूमिकेत दिसणार आहेत. मराठमोळा देवदत्त नागे देखील या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण पात्र साकारले आहे. २ ऑक्टोबर रोजी या चित्रपटाचा टीझर अयोध्यामध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. दरम्यान या चित्रपटाबद्दल नवीन माहिती समोर आली आहे.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

आणखी वाचा – “प्रभू रामचंद्रांची अयोध्या नगरी, योगी आदित्यनाथजी अन्…” प्रसिद्ध मराठमोळ्या गायिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

नुकतंच प्रभासने सोशल मीडियावर चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये श्रीराम यांच्या अवतारातला त्याचा लूक समोर आला आहे. एका गुडघ्यावर बसून हातामधील धनुष्यबाण आकाशाकडे धरुन असलेल्या प्रभासने पारंपारिक वस्त्रे परिधान केली आहे. पोस्टरमध्ये धनुष्यावर बाण चढवल्यामुळे झालेला परिणाम स्पष्ट दिसत आहे. बाणाच्या टोकाला लागूनच चित्रपटाचे नाव आहे. नावाखाली ‘असत्यावर सत्याचा होणारा विजय साजरा करुया’ असे लिहिले आहे. पोस्टरमध्ये हा चित्रपट १२ जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

आणखी वाचा – “गुरुवर्य दिघे साहेबांच्या आशीर्वादाने…” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रसाद ओकच्या ‘माझा आनंद’ पुस्तकाचे अनावरण

पोस्टरला कॅप्शन देताना प्रभासने “|| आरंभ || अयोध्यानगरीतील शरयू नदीच्या काठावर सुरु होणाऱ्या अद्भुत प्रवासाचे साक्षीदार व्हा. चित्रपटाचे पहिले पोस्टरचे अनावरण करताना फार आनंद होत आहे. चित्रपटाचा टीझर २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजून ११ मिनिटांनी प्रदर्शित होणार आहे”, असे म्हटले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. तान्हाजीनंतरचा त्याचा हा दुसरा हिंदी चित्रपट आहे. हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.