मी २०१६ मध्ये कनीजचं स्टेजवर चुंबन घेतलं. पण माझा उद्देश चुकीचा नव्हता. ती कृती मी केवळ विनोद निर्मीतीसाठी केली होती. तिच्यासोबत लैंगिक गैरवर्तन करण्याचा माझा उद्देश नव्हता. पण तरीही माझ्या कृतीतून ती दुखावली असल्यानं मी तिची मनापासून माफी मागते. तेव्हा माझ्या कृतीतून कनीज दुखावली गेल्याचं लक्षात आलं त्यानंतर या प्रकरणावर मी २०१७ मध्ये तिच्याशी बोलले. तिची मी माफी मागितली. माझा उद्देश लैंगिक गैरवर्तन करण्याचा नव्हता हे लक्षात आल्यावर तिनं माझ्या माफीचा स्वीकार केला. पण तरीही मी तिची पुन्हा माफी मागते’ असं म्हणत तिनं ट्विटरवर माफी मागीतली आहे.
— Aditi (hot takes 4 koolkidz) (@awryaditi) October 10, 2018
दोन वर्षांपूर्वी अंधेरीमध्ये एका कॉमेडी शोचं सुत्रसंचालन करत असताना आदिती मित्तलनं माझ्या परवानगी शिवाय माझे जबरदस्तीने चुंबन घेतले. हा प्रकार माझ्यासाठी लाजिरवाणा आणि धक्कादायक अनुभव होता. प्रत्येक व्यक्तीची आपली एक इच्छा आणि सीमा असते. माझ्या प्रकरणात आदितीने याचे उल्लंघन केले. तिनं माझे आरोप नाकारले होते. या प्रकरणात अदितीनं माझी सार्वजनिकरित्या माफी मागावी, तिनं असं केल्यास मी हा मुद्दा इथेच संपवून टाकेन असं कनीजनं आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर अदितीनं रात्री उशीरा ट्विटवर माफी मागीतली आहे.