Adnan Sami Birthday: ‘लिफ्ट करा दे’ फेम सिंगर अदनान सामी यांच्याबद्दल खास गोष्टी

बॉलिवूड सिंगर अदनान सामी यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्या आयुष्यातील खास गोष्टी.

adnan-sami-birthday-special

बॉलिवूड सिंगर अदनान सामी आज आपला वाढदिवस साजरा करत आहेत. अदनान सामी यांचा जन्म आजच्या दिवशी १५ ऑगस्टच्या दिवशी पाकीस्तानमध्ये अरशद सामी खान आणि नौरीन यांच्या कुटूंबात झाला. त्यांचे वडील पाकिस्तानी लष्करात स्क्वाड्रन लीडर पदावर कार्यरत होते. १९६५ मध्ये भारत-पाक युद्धात फ्लाइट लेफ्टनंट म्हणून ते सामील झाले होते. ‘लिफ्ट करादे’, ‘तेरा चेहरा’, ‘दिल क्या करे’ सारखे अनेक चार्टबस्टर सॉंग आजही लोक एकांतात ऐकण्यासाठी पसंती देतात. फक्त गाण्यांसाठीच नव्हे तर त्यांच्या यशस्वी ट्रान्सफॉर्मशन जर्नीसाठी देखील त्यांना ओळखलं जातं. आज त्यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्या आयुष्यातील खास गोष्टी.

गायिका आशा भोसले कनेक्शन

अदनान सामी जेव्हा १० वर्षाचे होते, त्यावेळी आर.डी. बर्मन यांच्या एका कॉन्सर्टमध्ये बॉलिवूड गायिका आशा भोसले यांच्यासोबत भेट झाली होती. अदनान यांना लहानपणापासून संगीतात रस होता. पियानोवादनात तर त्यांची बोटंही कोणी धरू शकणार नाही. त्यांचं हे टॅलेंट पाहून गायिका आशा भोसले यांनी संगीत क्षेत्रातच करिअर करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं. त्यानंतर २००० साली रिलीज झालेल्या ‘लकी’ चित्रपटातून ‘कभी तो नजर मिलाओ’ म्हणत अदनान यांनी सगळ्यांवर जादू केली. विशेष म्हणजे यात गाण्यात अदनान सामी यांच्यासोबत गायिका आशा भोसले यांनीच आवाज दिला. या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये यशस्वी संगीतकार म्हणून स्वत:चा ठसाही उमटवला.

गायनासोबत अभिनयातही

बॉलिवूड सिंगर अदनान सामी यांनी केवळ गायनानेच नव्हे तर अभिनयाने देखी चाहत्यांचं मन जिंकलंय. १९९५ मध्ये रिलीज झालेल्या ‘सरगम’ या पाकीस्तानी चित्रपटात त्यांनी अभिनय केला होता. ‘बजरंग भाईजान’ चित्रपटात ‘भर दो झोली मेरी’ हे गाणारं ‘कव्वाल’ च्या भूमिकेतला अदनान सामी आजही प्रेक्षकांच्या मनात बसलाय.

सर्वात पहिलं गाणं इंग्रजी भाषेत

आतापर्यंत अदनान सामी यांनी वेगवेगळ्या अल्बम सॉंग आणि हिंदी फिल्म सॉंग्स गायलेले आपण पाहिलेत. पण तुम्हाला माहितेय, गायक अदनान सामी यांचं सगळ्यात पहिलं गाणं कोणतं होतं? तर अदनान सामी यांनी सगळ्यात पहिलं गाणं हिंदीमधून नव्हे तर इंग्रजीमधून गायलंय. १९८६ साली रिलीज झालेलं इंग्रजी गाणं ‘रन फॉर हीस लाईफ’ हे त्यांचं पहिलं वहिलं अल्बम सॉंग होतं. हे सॉंग ‘यूनिसेफ’साठी रेकॉर्ड करण्यात आलं होतं. या गाण्याला मिडल ईस्ट देशांमधून बरीच पसंती मिळाली होती.

 

दक्षिण उत्तरेकडील चित्रपटांसाठी गायली गाणे

अदनान सामी यांनी फक्त बॉलिवूडच नव्हे तर देशाच्या दक्षिण उत्तरेकडील राज्यातील वेगवेगळ्या चित्रपटांसाठी देखील आपल्या आवाजात गाणी गायली आहे. ‘बूम बूम’, ‘नेन्जामेलम’, ‘कढाल’, ‘ओह इन्था कढाल’, ‘डोन्ट वरी महाडेबा’ या सर्व गाण्यांचा यात समावेश आहे.

 

लिमका बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

अदनानने 1986 मध्ये त्याच्या संगीत कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिलं नाही. प्रत्येक गाण्यातून त्यांनी एक एक यशाची पायरी चढत वैयक्तिक संगीत अल्बम, तसेच अनेक चित्रपटांसाठी रोमँटिक गाणी सुपरहिट ठरली. अदनानला उत्तम संगीतासाठी नौशाद म्युझिक अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. देशाची गानकोकिळा लता मंगेशकर यांना देखील या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल. अदनानला पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलंय. इतकंच नव्हे तर सलग दोन रात्रं परफॉर्म करणारा एकमेव आशियाई कलाकार म्हणून लिमका बूक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद करण्यात आलीय.
अदनान सामी यांची ट्रान्सफॉर्मेशन जर्नी, वैयक्तिक आयुष्य चढउतार, चार विवाह या सगळ्या गोष्टी अनेकांना माहित आहे. पण अदनान सामी बद्दलच्या या खास गोष्टी खूप कमी लोकांना माहिती आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Adnan sami birthday special 5 lesser known facts about the lift karadey singer that we bet you didnt know prp

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या