अर्जुन कपूरनंतर मलायका अरोरालाही करोनाची लागण

थोड्या वेळापूर्वीच अर्जुनने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित करोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती.

arjun-malaika-
मलायका अरोरा, अर्जुन कपूर

अभिनेता अर्जुन कपूरला करोनाची लागण झाल्यानंतर आता त्याची प्रेयसी व अभिनेत्री मलायका अरोरा हिलासुद्धा करोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. मलायकाची बहीण अमृता अरोरा हिने याबद्दलची माहिती ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना दिली. थोड्या वेळापूर्वीच अर्जुनने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित करोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती.

तीन दिवसांपूर्वी अर्जुनने शूटिंगला सुरुवात केली होती. शूटिंगदरम्यान फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर अर्जुनचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने शूटिंग थांबवण्यात आली आहे. अर्जुनला कोणतीच लक्षणे नसून त्याला घरीच क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यानंतर आता मलायकाचाही करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं कळतंय. मलायकाने अद्याप याबद्दल कोणतीच माहिती दिलेली नाही.

https://www.instagram.com/p/CEydxJNp3mB/

आणखी वाचा : अर्जून कपूरला करोनाची लागण; नीना गुप्ता, रकुल प्रीत सिंहसोबत करत होता शूटिंग

देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४१ लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील २४ तासांत ९० हजार ६३३ करोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. आतापर्यंतची ही एका दिवसांतील सर्वात मोठी वाढ आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: After arjun kapoor now malaika arora tests positive for covid 19 ssv

ताज्या बातम्या