scorecardresearch

कधी एक्स बॉयफ्रेंडला मारहाण तर कधी शर्लिन चोप्राशी पंगा; ‘या’ कॉन्ट्रोव्हर्सींमुळे चर्चेत राहिलेली राखी सावंत

राखी सावंत मूळची मुंबईची असून तिने डान्समधून आपल्या करियरची सुरवात केली

कधी एक्स बॉयफ्रेंडला मारहाण तर कधी शर्लिन चोप्राशी पंगा; ‘या’ कॉन्ट्रोव्हर्सींमुळे चर्चेत राहिलेली राखी सावंत
फोटो सौजन्य : लोकसत्ता

मराठी ‘बिग बॉस’मुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे राखी सावंत, एकीकडे तिने बॉयफ्रेंड आदिल खानबरोबर सुखी संसाराची स्वप्न बघत असताना मुंबईतील आंबोली पोलिसांनी तिला अटक केली आहे. एका मॉडेलचा फोटो व्हायरल केल्याचा आरोप राखी सावंतवर करण्यात आला आहे. सावंत हे काही नवे नाही. याआधी ती अनेकदा वाद निर्माण केले आहेत. ज्यामुळे ती समाजमाध्यमात कायमच चर्चेत राहिली आहे. तिचे याआधीचे वाद जाणून घेऊयात

मिकाबरोबरचे किसिंग प्रकरण :

राखी सावंत गेली अनेकवर्ष मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. २००६ साली ती चर्चेत आली ती गायक मिका सिंगमुळे, त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत सर्वांसमोर तिला जबरदस्तीने किस केले. राखीने त्याच्याविरुद्ध तक्रार केल्याने तो अडचणीत आला होता.

एक्सबॉयफ्रेन्डच्या कानशिलात लगावली :

राखी सावंतची प्रेम प्रकरणंदेखील तितकीच गाजली, अभिषेक अवस्थीबरोबर राखी रिलेशनशिपमध्ये होती. ‘नच बलिये 3’ आणि ‘जरा नचके देखा’ सारख्या शोमध्ये दिसले होते. तथापि, २०११ मध्ये व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी,अभिषेकने फसवणूक केल्याचे समजल्यानंतर तिने नात्याला पूर्णविराम दिला. जेव्हा तो माफी मागण्यासाठी तिच्या घरी पोहोचला तेव्हा तिने माध्यमांसमोर त्याला अनेक वेळाकानशिलात लगावली.

राखी सावंतच्या अटकेपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल, सासरच्या मंडळींवर केले गंभीर आरोप, म्हणाली, “काही लोक…”

सनी लियोनीवर टीका :

पॉर्नस्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीवर राखीने कायमच टीका केली आहे. सनीने जिस्म २ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सनीला भारतात येण्यापासून रोखावे अशी राखीची इच्छा होती कारण तिच्या म्हणण्यानुसार सनी देशाची तरुणाई उध्वस्त करू शकते.

हनिमूनआधी राखी सावंत आदिल खानसह उमराहला जाणार, स्वत:च केला खुलासा, म्हणाली…

शर्लिन चोप्रा बरोबर वाद :

‘बिग बॉस १६’ घरात चित्रपट निर्माता साजिद खानच्या सहभागावरून राखी आणि शर्लिन यांच्यात जोरदार वाद झाला. त्यांच्या अपमानास्पद वक्तव्यासाठी दोघांनी एकमेकांवर मानहानीचा खटलाही दाखल केला होता.

कॉस्मेटिक सर्जरी :

आज बॉलिवूडमध्ये अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी सर्जरी करत असतात मात्र उघडपणे हे कबूल करत नाही. मात्र राखी सावंतने ‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमात हे मेनी केले होते तिने सर्जरी केली आहे. तिचे म्हणणे असे होते की जे देव देऊ शकत नाही ते डॉक्टर देतात.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-01-2023 at 15:49 IST

संबंधित बातम्या