after came to mumbai hansika motwani sohael khaturiya reacts on their honeymoon plans spg 93 | लग्नानंतर हंसिका मोटवानी पतीसह मुंबईत दाखल; हनिमूनच्या प्रश्नावर लाजत म्हणाली.... | Loksatta

लग्नानंतर हंसिका मोटवानी पतीसह मुंबईत दाखल; हनिमूनच्या प्रश्नावर लाजत म्हणाली….

सिका आणि सोहेल खातुरिया अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात .

लग्नानंतर हंसिका मोटवानी पतीसह मुंबईत दाखल; हनिमूनच्या प्रश्नावर लाजत म्हणाली….
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

अभिनेत्री हंसिका मोटवानीच्या लग्नाच्या चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. अखेर ४ डिसेंबर रोजी हंसिकाने बॉयफ्रेंड सोहेल खातुरियाशी लग्नगाठ बांधली आहे. राजस्थानमध्ये जयपूरच्या एका किल्ल्यात जंगी सोहळ्यात हंसिका आणि सोहेल विवाहबंधनात अडकले. दोघाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

लग्नसोहळा संपवून ते मुंबईला परत आले आहेत. विमानतळावरच त्यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ते परतत असतानाच पापाराझींनी त्यांना गाठले. त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच आता ‘हनिमूनला कुठे जाणार?’ असा प्रश्न विचारला असता हंसिका मोटवानी लाजली, त्यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.हनिमूनवरचा प्रश्न विचारताच हंसिका चांगलीच हसायला लागली. तिला तिचे हसू आवरता येत नव्हते.

समंथाचा ‘यशोदा’ लवकरच येणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

गेल्या आठवडाभरापासून हंसिका आणि सोहेल यांच्या लग्नाची तयारी सुरू होती. अभिनेत्रीने तिच्या लग्नाआधीच्या सर्व फंक्शनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मेंहदी आणि संगीत कार्यक्रमात ती खूप सुंदर होती. प्रत्येक फोटोमध्ये ती थाटामाटात लग्न एंजॉ करताना दिसत होती. रविवारी हंसिका आणि सोहेलचं अखेर लग्न झालं असून तिच्या अभिनेत्रीच्या लग्नाचे काही फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत.

दरम्यान, सोहेलने २ नोव्हेंबर रोजी पॅरिसच्या आयफिल टॉवरसमोर गुडघ्यावर बसून हंसिकाला प्रपोज केलं होतं. हंसिकाने तिच्या इन्स्टाग्रामवरून फोटो शेअर करत तिच्या साखरपुड्याची माहिती दिली होती. माध्यमांमधील रिपोर्ट्सनुसार, सोहेल हा मुबईचा असून तो उद्योजक आहे. हंसिका आणि सोहेल खातुरिया अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात .

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 20:24 IST
Next Story
परेश रावल यांच्या अडचणीत वाढ; ‘या’ कलमांखाली गुन्हा दाखल