इंटीमेट व्हिडीओ लीक झाल्यामुळे लोकप्रिय भोजपूरी अभिनेत्री तृषा कर मधू गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तृषाचा बॉयफ्रेंड सोबतचा एक प्रायव्हेट इंटीमेट व्हिडीओ व्हायरल झाला होता. तिने चाहत्यांना विनंती केली होती की कृपया हा व्हिडीओ डाउनलोड करु नका आणि तुम्हाला जिकडे दिसेल तिकडून तो हटवण्याची विनंती केली होती. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तृषा गायब होती. आता तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
तृषाचा बॉयफ्रेंडसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर तिला सोशल मीडियावर अनेकांचे मेसेज आणि फोन येऊ लागले होते. त्यामुळे ती सोशल मीडियापासून लांब होती. पण तृषाने आता तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती भावूक झाल्याचे पाहायला मिळते.
व्हिडीओ शेअर करत तृषाने ‘जर विजय निश्चित असेल तर भित्रे सुद्धा लढू शकतात. पराभवाची खात्री असूनही मैदान न सोडणाऱ्यांना शूर म्हटले जाते. जितके घाणेरडे बोलायचे आहे तेवढे बोला मला सगळं मान्य आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
तृषाने भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले होते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. पण इंटीमेट सीन व्हायरल झाल्यामुळे तिच्यावर सोशल मीडियावर टीका केली जात आहे. या व्हिडीओमुळे करिअर उद्धवस्त झाल्याचे तिने म्हटले होते.