Top 10: रुबिना दिलैकच्या गाण्यापासून अली जफरच्या १०० कोटींच्या दाव्यापर्यंत,सर्व काही एका क्लिकवर

लग्नानंतर रुबिना तिच्या मित्र-मैत्रीणींबरोबर ऍन्जॉय करत असून तिने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे.

टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैकनं गुरुवारी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत प्रियकर अभिनव शुक्लाबरोबर लग्नगाठ बांधली. ‘छोटी बहू’ आणि ‘शक्ती- अस्तित्व के एहसास की’ यांसारख्या मालिकांमुळे घराघरात पोहोचलेल्या रुबिनाच्या लग्नाचे फोटो,व्हिडिओज सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून तिने नुकताचं एक व्हिडिओ शेअर केला आहे.
लग्नानंतर रुबिना तिच्या मित्र-मैत्रीणींबरोबर ऍन्जॉय करत असून तिने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती पती अभिनवसाठी गाणं म्हणतांना दिसून येत आहे. ‘टायगर जिंदा है’ चित्रपटातील ‘दिल दिया गल्ला’ हे गाणं म्हणत असून ती फुलऑन रोमॅन्टिक मुडमध्ये असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे.

‘छोटी बहु’ या मालिकेतून नावारुपाला आलेली रुबिना सध्या अभिनवबरोबर क्वॉलिटी टाईम घालवत असून सध्या तिच्या चाहत्यांमध्ये तिची आणि अभिनवची चर्चा सुरु आहे. या दोघांच्या चर्चांशिवाय आज कलाविश्वात संगीतकार अली जफरने मीशा शफीवर ठोकलेल्या दाव्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया अलीने ठोकलेल्या दाव्या मागचं कारणं आणि बी- टाऊनमधील इतर चर्चांविषयी…

…म्हणून अली जफरने केला मीशावर १०० कोटींचा दावा

फोटो पाहून दीपिकालाही बसला जबरदस्त धक्का, तुम्ही याला ओळखलंत का?

‘दबंग ३’ मध्ये साकिब सलीम साकारणार ‘ही’ भूमिका

जाणून घ्या निकला पहिल्यांदाच भेटल्यावर काय म्हणाली प्रियांकाची आई

तैमुरचे ‘हे’ नवे सवंगडी पाहिलेत का?

भारतात परतलेल्या ‘देसी गर्ल’च्या पदरात पडला आणखी एक चित्रपट!

‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ : ‘हा’ अभिनेता साकारणार अटलबिहारी वाजपेयींची भूमिका

इरफान खान या वर्षअखेरीस परतणार?

…आणि हिना खान झाली पुन्हा एकदा ट्रोल!

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: After marriage rubina dilaik sings song for husband