गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आला होता. त्यानंतर प्रत्येक व्यक्ती जेवढं शक्य होईली तेवढी मदत करत होता. मात्र, अशा वेळी बॉलिवूड कलाकारांनी पुढे येऊन काही मदत केली नव्हती. त्यामुळे मनसेने नेत्या शालिनी ठाकरे यांनी ट्वीट करत सोनू सूदवर टीका केली होती. ‘करोना काळात सोनू सूद नावाच्या एका महान ‘मसीहा’चा जन्म झाला होता, पण कोकणच्या पूरपरिस्थितीत मात्र हे महात्मे गायब आहेत,’ असे त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर आता सोनू सूदने या पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. तो काही भागात अडकलेल्या लोकांना मूलभूत गरजा देण्याचा प्रयत्न करत आहे. सोनू चिपळूण, महाड आणि इतर अनेक अंतर्गत भागात गरजेच्या वस्तू पाठवणार आहे.

या विषयी बोलताना सोनू म्हणाला, ‘ही गावांचे पूरामुळे फार नुकसान झाले आहे आणि ही सर्व गावं सगळ्या प्रमुख महामार्गांपासून २०-३० किलोमीटर लांब आहेत. त्यामुळे तिथे मदतीसाठी लागणाऱ्या गोष्टी पोहोचू शकल्या नाही. आम्ही या गावांच्या सरपंचांशी आधीच बोललो आहोत. मूलभूत गरजा जसे बादल्या, ग्लास, भांडी, चटई, कपडे आणि अगदी खाद्यपदार्थ सर्व पाठवलं जात आहे. कुटुंबांना वैयक्तिकरित्या वितरित करण्यासाठी माझी टीम तिथे असणार आहे.’

आणखी वाचा : शिल्पा शेट्टीच्या मुंबईतील ‘या’ आलिशान रेस्टॉरंटमध्ये असते बॉलिवूड कलाकारांची रेलचेल!

महामार्गा जवळ असलेल्या गावांमध्ये गरजेच्या वस्तू आधीच पोहोचल्या आहेत. मात्र, आत असलेल्या गावांमध्ये अजूनही जीवनावश्यक गोष्टी पोहोचू शकल्या नाहीत. सोनू आणि त्याची टीम या आतील गावांपर्यंत जीवनावश्यक गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. क्षेत्रपाल, रुद्राणी, दोंडाशी आणि इतर अनेक गावांना मदतीसाठी लागणाऱ्या गोष्टी पाठवल्या जातं आहेत. ही मदत या संपूर्ण प्रदेशातील १ हजारहून अधिक घरांसाठी केली जाणार असून या सगळ्या गोष्टींचा दुसरा ट्रक ४ दिवसांमध्ये गावात पोहोचणार आहे.

आणखी वाचा : ‘गुप्तांग दाखवण्यात येणार नाही असं सांगून…’,पॉर्नोग्राफी प्रकरणात एका अभिनेत्रीचा खुलासा

या गावकऱ्यांना त्यांच्या जीवनावष्यक गोष्टी मिळणे हे मुख्य सोनूचा मुख्य हेतू आहे. ज्यामुळे या एवढ्या मोठ्या संकटाला तोंड दिल्यानंतर आता ते त्यांच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करू शकतील. सूद चॅरिटी फाऊंडेशनची टीम प्रत्येक व्यक्तीला मदत करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे.

काय म्हणाल्या होत्या शालिनी ठाकरे?

कोरोना काळात सोनू सूद नावाच्या एका महान ‘मसीहा’चा जन्म झाला होता, पण कोकणच्या पूरपरिस्थितीत मात्र हे महात्मे गायब आहेत. मुंबईत राहून, इथे नाव आणि पैसा कमावून यांची समाजसेवा ही फक्त राज्याबाहेरील लोकांपुरतीच आहे का..?, असे ट्वीट त्यांनी केले होते.

View this post on Instagram

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

दरम्यान, सध्या सोनू हा काश्मिरमध्ये आहे. तिथून तो अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. त्यापैती एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सोनू रस्त्यावर चप्पल विकणाऱ्याकडे जाऊन चप्पलची किंमत विचारताना दिसतं आहे. एवढंच नाही तर तिथे चप्पल घ्यायला जेणारी जी व्यक्ती सोनूचं नावं सांगेल त्याला चप्पलेवर २० टक्के सूट मिळणार आहे.