पतीचा जामीन मंजूर होताच शिल्पा शेट्टीने केली पोस्ट, म्हणाली…

पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा १९ जुलैरोजी अटक झाली होती. पोलिसांच्या चौकशीत राज कुंद्राविरोधात अनेक पुरावे हाती लागल्याने राज कुंद्राच्या न्यायालयिन कोठडीत वाढ होत गेली होती.

Shilpa Shetty, Shilpa shetty defamation, Raj kunda, Raj kundra pornography case, Shilpa Shetty defamation Raj Kundra case,
शिल्पाची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

पॉर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला दिलासा मिळाला आहे. मुंबईतील मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून राज कुंद्राला जामीन मंजूर करण्यात आला आहे. 50 हजारांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने राज कुंद्राला जामीन मंजूर केलाय. 19 जुलैला मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला अटक केली होती. पतीचा जामीन मंजूर झाल्यानंतर शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक सकारात्मक स्टोरी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शिल्पाने इंद्रधनुष्य असलेला फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर ‘एका मोठ्या वादळानंतरच सुंदर इंद्रधनुष्य दिसते. हे इंद्रधनुष्य वादळानंतरदेखील अनेक चांगल्या गोष्टी होऊ शकतात हे सांगते’ या आशयाची पोस्ट शिल्पाने केली आहे.

पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा जुलैपासून अटकेत आहे. पोलिसांच्या चौकशीत राज कुंद्राविरोधात अनेक पुरावे हाती लागल्याने राज कुंद्राच्या न्यायालयिन कोठडीत वाढ होत गेली. राज कुंद्रासह चार आरोपींविरोधात मुंबई पोलिसांनी दीड हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलंय. कुंद्रा हा पॉर्नोग्राफी प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचे पुरावे गुन्हे शाखेला मिळाले आहेत. कुंद्रासह मालमत्ता कक्षाने कारवाई करून या अश्लील अ‍ॅप्लिकेशनच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचा प्रमुख रायन जॉन मायकल थॉर्प यालाही अटक केली होती. त्याचाविरोधातही गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी ३७ वे न्यायालय यांच्याकडे हे आरोपपत्र दाखल करण्यात आले.

शिल्पा शेट्टीने नोंदवला होता जबाब

शिल्पाच्या साक्षीनुसार, राज कुंद्रा यांने २०१५ मध्ये “विआन इंडस्ट्रीज ली.’ नावाची कंपनी सुरू केली होती. त्या कंपनीमध्ये शिल्पा शेट्टीचे २४.५० टक्के समभाग होते. या कंपनीत शिल्पा एप्रिल २०१५ ते जुलै २०२० या कालावधीत संचालक पदावर होती. त्यानंतर तिने वैयक्तिक कारणास्तव संचालकपदाचा राजीनामा दिला असल्याचे साक्षीत सांगितले. हॉटशॉट अ‍ॅप व बॉली फेम या संदर्भात आपल्याला काही माहिती नसल्याचे तिने सांगितले. कामात व्यस्त असल्याने पती राज कुंद्रा काय करतो त्यांना माहिती नसल्याचे शिल्पाने जबाबात सांगितले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: After raj kundra bail pornography case wife shilpa shetty social media post viral avb